आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Shane Warne; Tim Paine Run Out Review | Shane Warne On Tim Paine Run Out Third Umpire Decision; India Vs Australia 2nd Test Boxing Day Test

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्ड अंपायरच्या निर्णयावर वाद:शेन वॉर्न म्हणाले - टिम पेन स्पष्टपणे आउट होता, त्याची बॅट क्रीजच्यामध्ये आली नव्हती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 195 रन काढले

भारताविरोधात बॉक्सिंग-डे टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया कॅप्टन टिम पेनला थर्ड अंपायरने रनआउट दिले नाही. आता या निर्णयावर वाद होत आहे. माजी ऑस्ट्रेलियन स्पिनर शेन वॉर्नने थर्ड अंपायरच्या या निर्णयाला चुकीचे ठरवले.

वॉर्नने सोशल मीडियावर सांगितले की, 'थर्ड अंपायरकडून टीम पेनला रनआउट न केल्याने मला आश्चर्य वाटले. मला वाटत नाही की त्याची बॅट क्रीझच्या आत होती.'

काय झाले होते?
सामन्याच्या पहिल्या डावातील 55 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरून ग्रीन शॉट खेळून धावा करण्यासाठी धावला होता. ग्रीनने पहिले नकार दिला, नंतर धावांसाठी पुढे सरसावला. यानंतर नॉन-स्ट्राईकवर उभा असलेला कर्णधार टिम पेननेही धाव घेतली. त्यानंतर चेंडू विकेटकीपर ऋषभ पंतच्या हाती पोहोचला. त्याने उशीर न करता स्टंप पाडला. टीव्ही रीप्लेमधून स्पष्ट दिसले की, पेनची बॅट क्रीजच्या वर होती.

नियमांनुसार, जर एखाद्या फलंदाजाची बॅट क्रीज लाइनवर असते तर तो आउट असतो. मात्र थर्ड अंपायरने पेनला आऊट केले नाही.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 195 रन काढले
टीम पेन 13 धावांवर बाद झाला. स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या बॉलवर त्याचा कॅच हनुमा विहारीने घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 195 धावांवर कमी झाला. टीमसाठी मार्नस लाबुशेनने 132 बॉलवर सर्वात जास्त 48 रन बनवले. टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराहने सर्वात जास्त 4 विकेट घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...