आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • According To Shastri, Malik Has No Chance In T20 World Cup Squad! Said Now It Will Be Too Early To Make A Choice, Make It First

शास्त्रीच्या मते मलिकला T-20 विश्वचषकात संधी नाही!:म्हणाले- आता निवड करणे खूप घाईचे ठरेल, त्याला आधी तयार करा

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरानने आपल्या वेगानं अनेक दिग्गजांना वेड लावलं आहे आणि आता या दिग्गजांना असं वाटतंय की जम्मू-काश्मीरच्या वेगवान गोलंदाजाला आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळावी.

युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक त्याच्या वेगामुळे अलीकडच्या काळात चर्चेत आहे. IPL 2022 पासून आपल्या वेगामुळे चर्चेत असलेल्या उमरानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे.

उमरानसाठी शास्त्री प्रतिकूल

मात्र, नवी दिल्लीत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही, जिथे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. उमरानच्या वेगामुळे अनेकजण प्रभावित झाले आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतंय की जम्मू-काश्मीरच्या या वेगवान गोलंदाजाला आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळावी. मात्र, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याला अनुकूल नाहीत. उमरानला टी-20 विश्वचषक 2022 च्या संघात निवडणे खूप घाईचे असल्याचे त्याने म्हटले आहे.

उमरानला वेळ द्या

एका क्रिडावृत्त वाहिनीशी बोलताना शास्त्री म्हणाले, 'नाही, अजून T20 वर्ल्ड कपमध्ये नाही. आता सध्या उमरानला तयार करा. त्याला आणखी बरेच काही शिकायचे आहे. त्याला संघासोबत नक्की घेऊन जा. शक्य असल्यास, उमरानला 50 षटकांचे क्रिकेट किंवा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी द्या. त्याला कसोटी संघासाठी तयार करा आणि मग तो त्यात स्वताला कसा जुळवून घेतो ते पहा.

त्याचवेळी न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिटोरी म्हणाला, 'मला वाटतं की तो संघात नसला तरीही त्याने नेहमीच भारतीय संघासोबत असलं पाहिजे. मला वाटते की त्याची वेळ येईल.

उमरानची IPL मध्ये शानदार कामगिरी

उमरानने अलीकडेच IPL 2022 मध्ये त्याच्या वेगवान खेळामुळे बरीच मथळे निर्माण केली आहेत. त्याने 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या. त्याची वेगवान गोलंदाजी पाहून क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. IPL 2022 मध्ये उमरानने 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. यानंतर त्याची तुलना शोएब अख्तरशी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...