आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला भारत खूप आवडतो. तो सांगतो की त्याला भारतदेशाकडून खूप प्रेम मिळाले आहे. त्याचे भारतात येणे आणि जाणे इतके झाले आहे की तो गमतीशीरपणे म्हणतो की माझे आता आधारकार्ड सुद्धा बनले गेले आहे.
शोएब अख्तरने ANI ला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या आहेत. दोन्ही देशांमधील क्रिकेट आणि आशिया चषक वादावरही त्यांनी आपले मत मांडले. वाचा काय म्हणाला शोएब...
1. मी भारतात क्रिकेट खेळायला मिस करतो
शोएब अख्तर म्हणाला, "मी भारतात नियमितपणे येत असतो. मी इथे इतकं काम केलं आहे की माझ्याकडे आता आधार कार्डपण आहे. आणखी काय सांगू? भारतानं मला खूप प्रेम दिलं आहे. मी भारतात क्रिकेट खेळणे मिस करतोय.
2. पाकिस्तान नाही तर श्रीलंकेत आशिया कपचे आयोजन करा
तो म्हणाला, "जर आशिया चषक पाकिस्तानात होत नसेल तर तो श्रीलंकेत झाला पाहिजे. मला आशिया कप आणि विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानची फायनल बघायची आहे. जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फायनलशिवाय कोणीही नसावे.
3. निवृत्त होईपर्यंत कोहली ठोकणार 110 शतके
अख्तर म्हणाला, विराट कोहली हा फॉर्ममध्ये येणारच होता, यात नवीन असे काही नाही. आता त्याच्यावर कर्णधारपदाचे कोणतेही दडपण नाही. तो एकाग्रतेने खेळत आहे आणि यापुढेही खेळणार आहे. मला आशा आहे की कोहली जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल तेव्हा त्याचे 110 शतके होतील.
आशिया चषकाबाबत बोर्डाच्या बैठकीत निर्णय होईल
2023 च्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला मिळणार होते. ऑक्टोबर 2022 मध्ये BCCI चे सचिव जय शाह म्हणाले होते की जर आशिया कप पाकिस्तानमध्ये आयोजित केला गेला तर भारत या स्पर्धेतून माघार घेईल. मार्च महिन्यात आशिया क्रिकेट कौन्सिल (ACC) च्या बोर्ड बैठकीत होस्टिंगबाबत निर्णय घेतला जाईल.
शोएब सध्या लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळत आहे
शोएब अख्तर सध्या कतारमधील दोहा येथे लिजेंड लीग क्रिकेट मास्टर्स स्पर्धेत आशिया लायन्स संघाकडून खेळत आहे. अख्तरने लीगमध्ये आतापर्यंत एक ओव्हर टाकली आहे. यामध्ये त्याने 12 धावा दिल्या. लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये तीन संघ सहभागी होत आहेत.
यामध्ये इंडिया महाराजा, आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स यांचा समावेश आहे. यात हरभजनच्या नावावर लीगमध्ये सर्वाधिक 8 विकेट्स आहेत. गौतम गंभीरने सर्वाधिक 183 धावा केल्या आहेत. तर आशिया लायन्स तीनपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.