आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:शोएब अख्तरने कोरोनाविरोधातील लढाईत फंड गोळा करण्यासाठी भारत-पाक सीरीजचा प्रस्ताव मांडला

स्पोर्ट डेस्क3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'या सामन्यातून मिळणारे पैसे दोन्ही देशातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी कामी येतील'

माजी पाकिस्तान गोलंदाज शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसविरोधा लढाईत पैसे जमा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये  वन-डे सीरिज ठेवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानमधील एका दहशतवादी संघटनेकडून भारतावर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये एकही सीरिज खेळली गेली नाही. दोन्ही देश फक्त आयसीसी टूर्नामेंट आणि एशिया कपमध्येच समोरा-समोर येतात. शोएबने इस्लामाबादमधून प्रेस ट्रस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "संकट समयी मी दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची सीरीस खेळवण्याचा प्रस्ताव मांडतो. या सीरीजमध्ये कोणताही देश विजयी झाला तरी दोन्ही देशातील चाहते नाराज होणार नाहीत. विराट कोहलीने शतक मारल्यास आम्हाला आनंद होईल. बाबर आजमने शतक ठोकल्यास तुम्ही आनंदी व्हा. सामन्यांचा  परिणाम काहीही झाला, तरी दोन्ही देश विजयी होतील. या सामन्यात खूप प्रेक्षक येतील. पहिल्यांदाच दोन्ही देश एकमेकांसाठी खेळतील. यातून मिळणारे पैशींची कोरोनाशी सामना करण्यासाठी दोन्ही देशात समान वाटणी करावी. शोएब पुढे म्हणाले की, सध्या सर्वजण आपापल्या घरात बसून आहेत. हे सामना आता झाले नाही, तरी काही दिवसानंतर परिस्थिती बदल्यानंतर दुबईत खेळवले जाऊ शकतात. यासाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था केली जाऊ शकते. यामुळे दोन्ही देशातील राजकीय संबंधदेखील सुधारेल. अशा कठीण प्रसंगी दोन्ही देशांनी एकमेकांना मदत करायला हवी.भारताने आम्हाला 10 हजार वेंटिलेटर दिले, तर आम्ही भारताचे उपकार कधीच विसरणार नाहीत. ''

बातम्या आणखी आहेत...