आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Shoaib Akhtar Said New Zealand Killed Pakistan Cricket There May Be A Loss Of 200 Crores; News And Live Updates

न्यूझीलंडच्या निर्णयाने पाकिस्तानमध्ये वाद:शोएब अख्तर म्हणाला - न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली; 200 कोटींचे होऊ शकते नुकसान

रावळपिंडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोएब अख्तरने ट्विट करत केले विधान

न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारण देत पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंडच्या या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये वाद सुरु झाला आहे. न्यूझीलंडच्या या निर्णयावर पाकिस्तानातील क्रिकेट तज्ज्ञांपासून ते सामान्य क्रिकेट चाहत्यांपर्यंत नाराजी व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर जवळपास एक दशकानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामना होत होता.

पाकिस्तान सरकार ही मालिका पुर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करत होती. परंतु, यामुळे पाकिस्तानला मोठा झटका मिळाला असून या निर्णयामुळे 200 कोटींचे नुकसान होऊ शकते असे सांगितले जात आहे.

शोएब अख्तरने ट्विट करत केले विधान
पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. अख्तरने सोशल मीडियावर हँडलवर ट्विट करत म्हटले की, न्यूझीलंडने नुकतेच पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली. तर दुसरीकडे, पाकिस्तानचे विद्यमान कर्णधार बाबर आझम यांनीही न्यूझीलंडच्या या निर्णयावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय
पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघामध्ये 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिकाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंडने हा दौरा रद्द केला आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडला संघाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्तचर सूचना मिळाली होती. यामुळे आता संघाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...