आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅप्टनचा सल्ला गिलसाठी उपयोगी ठरला:शुभमन म्हणाला-पंड्याने नॅचरल गेम खेळण्यास सांगितले होते, विराट म्हणाला- गिल, भविष्यातला तारा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबादेत न्यूझीलंड आणि भारतादरम्यान खेळल्या गेलेल्या टी-20 सीरिजच्या शेवटच्या सामन्यात युवा ओपनर शुभमन गिलने नाबाद 126 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 168 धावांनी पराभूत केले आणि सोबतच 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. गिलला शानदार खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. सामन्यानंतर गिलने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की या खेळीसाठी त्याने वेगळे काही केले नाही, केवळ आपला नैसर्गिक खेळच तो खेळला. बीसीसीआयने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर विराट कोहलीने गिलचे इन्स्टाग्रामवर अभिनंदन केले आहे. कोलहीने गिलला भविष्यातील तारा म्हटले आहे.

गिलने म्हटले की देशासाठी खेळताना त्याला कसलाही थकवा जाणवत नाही. जेव्हा तुम्ही अभ्यास करता आणि त्याचे फळ मिळते, तेव्हा चांगले वाटते.

तो म्हणाला, 'टीमसाठी एक चांगली खेळी साकारल्याने मी खूप आनंदी आहे. षटकार मारण्याची प्रत्येकाची वेगळी शैली असते. हार्दिक भाईने मला म्हटले की मी माझा नैसर्गिक खेळ खेळावा आणि मला वेगळे काही करण्याची गरज नाही. मी असेच केले.'

हार्दिक म्हणाला

कर्णधार हार्दिक पंड्याने म्हटले, 'मैदानावर निर्णय घेताना सामान्यपणे मी माझ्या मनाचे ऐकतो. मी स्थिती समजून घेत वेळेनुसार निर्णय घेतो.'

टी-20 मध्ये भारताचा सर्वात तरुण शतकवीर बनला

गिल आता टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात तरुण शतकवीर बनला आहे. त्याने सुरेश रैनाचा विक्रम मोडला आहे. रैनाने 23 वर्षे 156 दिवसांचा असताना शतक ठोकले होते. तर गिलने 23 वर्षे आणि 146 दिवसांचा असताना हे यश मिळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...