आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने शतक झळकावले आहे. शुभमन गिलने या सामन्यात शतक झळकावून असा विक्रम केला आहे, जो यावर्षी कोणताही फलंदाज करू शकला नाही.
शुभमन गिलची ऐतिहासिक खेळी
शुभमन गिलचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. याआधी शुभमन गिलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्याचबरोबर या वर्षी तीन महिन्यात त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतकी खेळी खेळून मोठा विक्रम केला आहे. शुभमन गिल 2023 मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
या मैदानावरच झळकावले टी-20 शतक
23 वर्षीय शुभमन गिलने नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरच न्यूझीलंडविरुद्ध 54 चेंडूत टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शतक पूर्ण केले. शुभमन गिलने 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तो 126 धावा करून नाबाद परतला. त्याने 63 चेंडूत नाबाद 12 चौकार आणि 7 षटकार ठोकले.
टीम इंडिया मजबूत स्थितीत
भारताने पहिल्या डावात 3 बाद 289 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ही जोडी नाबाद आहे. कोहलीने कारकिर्दीतील 29 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे कोहलीने 14 महिने आणि 15 डावांनंतर कसोटीत अर्धशतक झळकावले आहे.
तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कोहलीने लाराचा विक्रम मोडला आहे.
रोहित 17 हजारी क्लबमध्ये सामील
शुभमन गिल 128 धावा करून बाद झाला. त्याला नाथन लायनने एलबीडब्ल्यू केले. तत्पूर्वी, चेतेश्वर पुजारा 42 धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. कर्णधार रोहित शर्माने 35 धावा केल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्माने एक खास विक्रम केला आहे, रोहितने इनिंगमध्ये 21 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 धावा पूर्ण केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावा करणारा तो भारताचा 7वा फलंदाज ठरला आहे. रोहितपूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली, एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरले आहेत. तत्पूर्वी, उस्मान ख्वाजाच्या 180 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.