आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा भारताचा पाचवा आणि सर्वात तरूण फलंदाज ठरला आहे. त्याने वयाच्या 23 वर्षे 132 दिवसात द्विशतक झळकावले आहे. त्याच्या या द्विशतकी खेळीने अनेक रेकॉर्डस केले आहेत. त्यात गिलने वनडे क्रिकेटमध्ये आपल्या एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कमीत कमी डावात हा टप्पा गाठणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे.
गिलने हा पराक्रम 19 वनडे सामन्यांच्या 19 डावांमध्ये केला आहे. यापूर्वीचा भारतीय विक्रम विराट कोहली आणि शिखर धवनच्या नावावर होता.
न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा तिसरा विश्वविक्रम केला आहे. त्याने आपल्याच देशाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.
विशेष म्हणजे शुभमनच्या या दमदार खेळीनेही चाहतेही जाम खूश झाले आहेत. गिलने सचिनचा रेकॉर्ड मोडल्यानंतर चाहते भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी या आनंदामध्ये सारा तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकरलाही सामील करून घेतले आहे.
सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्या नात्याबाबत चर्चा याआधीही मीडियामध्ये प्रसारीत झाले आहेत. या द्विशतकी खेळी नंतर चाहत्यांनी सारा आणि शुभमन चक्क त्याच्या लग्नाची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
शुभमनच्या द्विशतकानंतर साराची प्रतिक्रिया...
साराची शुभमनला घातलेली अट..
शुभमनची दमदार पारी सुरू असताना सारा..
शुभमनची खेळी पाहुन सचिनचा निर्णय..
सारा VS सारा
सचिन शुभमनची खेळी पाहुन भारावला...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.