आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Silver To Shubham Thorat, Fifth Medal To The University; Runner up In Fencing For The Second Consecutive Season, The University's First Silver

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा:शुभम थोरातला रौप्य, विद्यापीठाला पाचवे पदक; सलग दुसऱ्या सत्रात तलवारबाजीत उपविजेतेपद, विद्यापीठाला पहिले रौप्य

बंगळुरू16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता युवा मल्ल शुभम थोरातने महाराष्ट्रदिनी बंगळुरू येथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. त्याने स्पर्धेच्या कुस्ती गटात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला यंदा पहिले पदक मिळवून दिले. राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेता शुभम हा ७० किलो वजन गटात रौप्यपदकाचा मानकरी ठरला. या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर औरंगाबादच्या विद्यापीठाला यंदाच्या दुसऱ्या सत्रातील स्पर्धेत पाचवे पदक आपल्या नावे करता आले. यापूर्वी विद्यापीठाने प्रत्येकी दोन सुवर्णसह कांस्यपदक पटकावले आहे. तसेच विद्यापीठाला सलग दुसऱ्या सत्रामध्ये तलवारबाजीमध्ये उपविजेतेपद मिळाले. मल्ल शुभम थोरातने ७० किलो वजन गटात सलामी सामन्यात बनारस हिंदू विद्यापीठाच्या मल्लाचा ८-१ ने पराभव केला. त्यानंतर भोपाळच्या कुस्तीपटूचा ५-० ने पराभव केला. त्याने सेमीफायनलमध्ये पूर्वांचल विद्यापीठ मल्लाचा पराभव केला. त्याचा फायनलमध्ये पराभव झाला. या स्पर्धेत कोच प्रा. मंगेश डोंगरे, रामेश्वर विधाते यांचे मार्गदर्शन शुभमला लाभले.

बातम्या आणखी आहेत...