आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • SL Vs PAK Asia Cup 2022; Babar Azam DRS Review Vs Mohammad Rizwan, Babar Reminded The Umpire Said I Am The Captain: Babar Was Standing On The Boundary In The Match Against Sri Lanka, Wicketkeeper Rizwan Took DRS

बाबरने अंपायरला ​​​​​​​करून दिली आठवण:म्हणाला,मी आहे कर्णधार, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विकेटकीपर रिझवानने घेतला DRS

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी झालेल्या आशिया चषकाच्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानचा श्रीलंकेकडून 5 गडी राखून पराभव झाला. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तान आधीच पोहोचला आहे. अंतिम फेरीतही रविवारी श्रीलंका आणि पाकिस्तानची टीम आमनेसामने येतील.

पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानने श्रीलंकेपुढे122 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे श्रीलंकेने 18 चेंडू अगोदरच गाठले. या सामन्यातही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फ्लॉप राहिला. त्याला केवळ 30 धावा करता आल्या.

श्रीलंकेच्या डावादरम्यान पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिझवान आणि मैदानावर हजर असलेल्या पंचाने असे काही काम केले की पाक कर्णधार बाबर आझमला शेवटी सांगावे लागले की मी टीमचा कर्णधार आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

रिझवानने DRS घेतल्यानंतर बाबरने पंचांना सांगितले की, मी आहे संघाचा कर्णधार
रिझवानने DRS घेतल्यानंतर बाबरने पंचांना सांगितले की, मी आहे संघाचा कर्णधार

मोहम्मद रिझवानने बाबरला न विचारता घेतला DRS

खरेतर श्रीलंकेच्या डावात 16व्या षटकात हसन अली गोलंदाजी करत होता. त्यावेळी श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका हा फलंदाजी करताना ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटला न लागता तो चेंडू मोहम्मद रिझवानच्या ग्लोव्हजमध्ये गेला.

मोहम्मद रिझवानला वाटले की चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठावर आदळला आणि त्याच्या हातात कॅच आला आणि फलंदाज बाद झाला. यानंतर त्याने जोरदार अपील केले, मात्र मैदानी पंच असलेल्या अनिल चौधरी यांनी त्याला नाबाद घोषित केले.

त्यानंतर रिझवानने पंच यांना लगेच DRS घेण्याचे संकेत दिले. पंच अनिल चौधरी यांनीही ते लगेच DRS स्वीकारल्याचे संकेत दिले.

आझमने पंचांना विचारला प्रश्न

त्यानंतर बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करत असलेला कर्णधार बाबर आझमला ही गोष्ट काही समजली नाही मी DRS चा इशारा दिला नसतानाही पंचने DRS कसा घेतला गेला. तो पंचाजवळ येताच पंचांशी बोलला म्हणाला की मी कर्णधार आहे. मला न सांगता तुम्ही DRS कसे काय स्वीकारले?

नियमांनुसार, मैदानावर असलेल्या पंचावर ही जबाबदारी असते की कर्णधाराच्या ग्रीन सिग्नलनंतरच DRS मान्य करायचा. पण यावेळी भारतीय पंचांनी रिझवानच्या सांगण्यावरूनच DRS चा निर्णय घेतला होता.

रिव्ह्यू झाले बाद

तिसर्‍या पंचांनी मैदानी पंचाचा निर्णय योग्य असल्याचे मानल्यामुळे पाकिस्तानचा हा रिव्ह्यू बाद झाला. अशा परिस्थितीमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका बचावला. मात्र, पुढच्याच षटकात शनाका मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तो तंबूत परतला. त्याने 16 चेंडूत 21 धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...