आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायजमान ऑस्ट्रेलिया संघाच्या फाॅर्मात असलेल्या उस्मान ख्वाजा (नाबाद १९५) आणि स्मिथने (१०४) गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसाेटीत शानदार शतकी खेळी केली. याच शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने घरच्या मैदानावर तिसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर ४ बाद ४७५ धावा काढल्या आहेत. आता ख्वाजा आणि मॅट रेनशाॅ (५) मैदानावर कायम आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवशी ८४ षटकांपर्यंतचा खेळ हाेऊ शकला.
यादरम्यान ट्रेव्हिस हेडने ५९ चेंडूंमध्ये ७० धावांची वेगवान खेळी केली. यजमान ऑस्ट्रेलियाच्या स्मिथने १०४ धावांची खेळी करत करिअरमध्ये ३० व्या कसाेटी शतकाची नाेंद केली. यासह त्याने क्रिकेटच्या विश्वातील प्रसिद्ध डाॅन ब्रॅडमॅनला विक्रमात मागे टाकले.
दुसऱ्या दिवशीही दक्षिण आफ्रिकेच्या गाेलंदाजांना समाधानकारक कामगिरी करता आली नाही. टीमच्या केशव महाराज आणि रबाडाने प्रत्येकी एक बळी घेतला. आता ऑस्ट्रेलियाचा ख्वाजा द्विशतकाच्या वाटेवर आहे. यासाठी त्याला अवघ्या पाच धावांची गरज आहे. आता ताे हा माेठा पल्ला गाठू शकणार आहे. सध्या आफ्रिकेची गाेलंदाजी दुबळी ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.