आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Social Media Trolls Attacks । Rahul Gandhi । Tweeting India Remembers Her FlyingSikh । Milkha Singh

राहुल गांधी पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर:राहुल गांधींनी मिल्खा सिंहांसाठी लिहिले - India remembers 'her' #flyingSikh,लोक म्हणाले - भारत पुल्लिंगी आहे कि स्त्रीलिंगी?

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जास्तीत जास्त देशात लोक आपल्या देशाला मातृभूमी मानतात.

वरीष्ठ धावपटू मिल्खा सिंह यांच्या निधनाने संपूर्ण देश दु: खी आहे. नेते आणि कलाकार सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शनिवारी सकाळी 9.08 वाजता मिल्खासिंग यांना श्रद्धांजली अर्पण करुन एक ट्विट केले.

राहुल यांनी लिहिले, 'मिल्खा सिंह केवळ स्पोर्ट्स स्टार नव्हते, ते लाखो-कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांचे समर्पण आणि वागणे कौतुकास्पद आहे. मी त्याच्या कुटुंबियांबद्दल आणि मित्रांबद्दल संवेदना व्यक्त करतो.

ट्विटच्या शेवटी राहुल यांनी लिहिले, 'India remembers her #FlyingSikh' त्यांच्या वाक्यामुळे सोशल मीडिया ट्रोलर्स त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. ट्रोलर्स त्यांना प्रश्न विचारत आहेत की, भारत पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी? ट्रोलर्सने म्हटले की, त्यांना Her ऐवजी His चा उपयोग करायला हवा होता.

मनीष (@manishfci) नावाच्या यूजरने राहुल गांधींना सवाल केला की, श्रद्धांजली देताना ते झोपेत होते का? प्रदीप पाल (@Iproud108) नावाच्या यूजरने राहुल गाधींवर टीका करत म्हटले की, तुम्हाला इंग्रजी येत नाही तर इटालियन भाषांमध्ये ट्विट लिहू शकत होते.

ललित शर्मा (@lalitksharma) नामक यूजरने राहुल गांधींचे ट्विट शशी थरुरसोबत जोडले. त्यांनी म्हटले की, राहुल यांनी इंग्रजी शशी थरुर यांच्याकडून शिकायला हवी होती.

कसा ठरवला जातो देशाचा जेंडर
जास्तीत जास्त देशात लोक आपल्या देशाला मातृभूमी मानतात. आपल्या देशातही अनेक लोक भारत माता म्हणतात. खरेतर जर्मनी याला अपवाद आहे. तिथे, लोक देशाला पितृभूमी (Fatherland) म्हणणे पसंत करतात.

भारत माता म्हणत असल्याने Her म्हणणे योग्य
भारत देशाचे लिंग कोणते यावरुन राहुल गांधींना ट्रोल केले जात आहे. मात्र आपण बोलताना बहुतांशवेळा भारत माता असा उल्लेख करत असतो. यावर आजतकसोबत संवाद साधताना दिल्ली विद्यापाठाशी संलग्नित असलेल्या मैत्रैयी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. सविता पाठक म्हणाल्या की, 'जगातील इतर देशांपेक्षा भारतात वेगळ्या गोष्टींना समाजमान्यता आहे. भारतात मदरलँड म्हणजेच मातृभूमी असे म्हटले जाते. मात्र इतर काही देशांमध्ये फादर लँड असे म्हणतात. यामुळे Her हा शब्दप्रयोग योग्य ठरतो.'

3 कलाकार ज्यांच्या मुलीचे नाव इंडिया

  1. हॉलिवूडची प्रसिद्ध फिल्म थॉरचे अभिनेता क्रिस हेम्सवर्थने आपल्या मुलीचे नाव इंडिया रोज ठेवले आहे.
  2. साउथ अफ्रीकेचे प्रसिद्ध क्रिकेटर जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नाव इंडिया जेनी रोड्स ठेवले आहे.
  3. अमेरिकन अभिनेत्री मेरिसोल निकोल्स यांनी आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवले आहे.
बातम्या आणखी आहेत...