आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथा टी-20 सामना आज:दक्षिण आफ्रिकेची 2-1 ने आघाडी, यजमान भारतासाठी करा वा मराची स्थिती

राजकोट9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान टीम इंडियाने सलामीवीर आणि गोलंदाजांच्या सर्वाेत्तम कामगिरीतून गत सामन्यात आफ्रिकेला पराभूत करत मालिका गमावण्याचे सावट दूर केले. मात्र, आता राजकोटच्या मैदानावर भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. याच मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या मालिकेतील चौथा टी-२० सामना शुक्रवारी खेळवला जाणार आहे.

सध्या सलगच्या दोन विजयांनी आफ्रिका संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे राजकोटच्या मैदानावरील हा सामना यजमान भारतासाठी “करा वा मरा’ असा आहे. सध्या यजमान टीमची मधली फळी सपशेल अपयशी ठरत आहे. दुसरीकडे सर्वाेत्तम खेळीतून आफ्रिका संघ फॉर्मात आहे. त्यामुळे आफ्रिका संघाने राजकोटमध्ये मालिका विजय साजरा करण्यासाठी कंबर कसली आहे.

भारतीय संघाच्या कर्णधार ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांना आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. ऋषभ पंत हा सातत्याने अपयशी ठरत आहे.

ऋतुराज, ईशानवर मदार :
गत करा वा मरा सामन्यात पुण्याच्या ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशनने भारतीय संघाला तारणारी खेळी केली. त्यामुळे यजमान टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात बाजी मारून मालिकेत विजयाचे खाते उघडता आले. आताही या दोघांकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची आशा आहे. गत सामन्यातील झंझावाती खेळीतून ऋतुराजला आपल्या टी-२० करिअरमध्ये पहिल्या अर्धशतकाची नोंद करता आली. तसेच ईशान किशनने करिअरमध्ये चौथ्या अर्धशतकाची नोंद केली.

भुवी, चहल फॉर्मात :
भारतीय संघाकडून भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि युवा गोलंदाज हर्षल पटेल सध्या घरच्या मैदानावर फॉर्मात आहेत. चहल आणि हर्षलने गत सामन्यात सर्वाेत्तम गोलंदाजी करून यजमान भारताचा विजय निश्चित केला. चहलने या सामन्यात तीन बळी घेतले. तसेच भुवनेश्वरच्या नावे या मालिकेत आता ६ विकेटची नोंद झाली आहे. त्यामुळे आता याच खेळीमध्ये सातत्य ठेवत भारतीय गोलंदाज आफ्रिकन फलंदाजांना रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत.

नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा :
राजकोटच्या मैदानावर आतापर्यंत ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले. यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी दोन सामने जिंकले. या मैदानावर १७७ च्या सरासरीने धावसंख्येची नोंद आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा मानला जाताे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाची प्रथम गोलंदाजीला पसंती असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...