आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामध्ये क्रिकेट:भारतासोबत ऑगस्टमध्ये 3 टी-20 सामन्यांची सीरीज होऊ शकते, दक्षिण आफ्रीकेने व्यक्त केला विश्वास

स्पोर्ट डेस्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिकेट द.अफ्रीकेचे डायरेक्टर ग्रीम स्मिथ म्हणाले- खेळाला आता इव्हेंट म्हणून नाही, तर बिझनेस म्हणून पाहावा

क्रिकेट दक्षिण आफ्रीके (सीएसए)ला आशा आहे की, ऑगस्टमध्ये भारतीय संघासोबत त्यांच्या देशात 3 टी-20 सामन्यांची सीरीज खेळली जाऊ शकते. सध्या सीएसए भारतासोबतच्या सीरिजपूर्वी वेस्टइंडीजच्या प्रलंबित दौऱ्यासाठी नवीन तारखेचा शोधात आहे.

द.आफ्रीकेने कोरोना व्हायरसमुळे आपला श्रीलंका दौरा रद्द केला. येथे ठराविक ओव्हरची सीरिज खेळली जाणार होती. परंतू, आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी सीएसए भारताला आपल्या देशात सीरीज खेळण्यासाठी बोलवत आहे.

सीरीजबाबत बीसीसीआयसोबत चर्चा सुरू आहे

सीएसए डायरेक्टर ग्रीम स्मिथने प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये गुरुवारी सांगितले की, ''टी-20 सीरीजसाठी आम्ही अनेकवेला बीसीसीआयसोबत संपर्क करत आहोत. आम्हाला आशा आहे की, तीन टी-20 साठी त्यांच्याकडून होकार येईल. ऑगस्टपर्यंत काय होईल, कोणालाच माहित नाही. प्रत्येकजण फक्त अंदाज लावत आहे.'' 

द.आफ्रीकेचा संघ मार्चमध्ये भारत दौऱ्यावर आला होता. भारतासोबत तीन वन-डे सामन्यांची सीरिज होणार होती. पहिला मॅच 12 मार्चला धर्मशालामध्ये होणार होता, पण तो पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर 15 आणि 18 मार्चला होणारे सामने रद्द करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...