आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे बदल:टी-20  फाॅरमॅटमध्ये पुढच्या सत्रापासून गाेलंदाजांनाही खास हेल्मेट

लंडन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर्जेदार कामगिरीने क्रिकेटला जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. यासाठी आयसीसीचा पुढाकार अधिक लक्षवेधी ठरताे. याचदरम्यान खेळाडूंच्या आराेग्याबाबतही विशेष अशी खबरदारी घेण्यासाठी आयसीसीने नव्या बदलाचे संकेत दिले. यासाठी आता फलंदाजांपाठाेपाठ गाेलंदाजांनाही हेल्मेट वापरावे लागणार आहे. त्यामुळे गाेलंदाज हे हेल्मेट घालूनच गाेलंदाजी करताना दिसणार आहे. पुढच्या वर्षी क्रिकेटच्या झटपट टी-२० या फाॅरमॅटमध्ये या प्रयाेग साकारण्यात येईल. यासाठी याॅर्कशायरचा वेगवान गाेलंदाज बेन काेेडने गाेलंदाजांना सहज वापरता येईल असे खास पद्धतीचे हेल्मेट तयार केले. त्याने स्वत: याचे डिझाइन केले. त्यामुळे आता हे पुढच्या सत्रापासून गाेलंदाजांना वापरता येईल. सध्या हेल्मेट घालून गाेलंदाजी करण्याचा प्रयाेग न्यूझीलंडमध्ये सुरू आहे. येथील गाेलंदाज हे देशांतर्गत स्पर्धेत हेल्मेटचा वापर करताना दिसतात.

यजमान आॅस्ट्रेलियाचा वेगवान गाेलंदाज कॅमरून ग्रीनला गत आठवड्यात भारत ए संघाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान बुमराहने माेठा फटका मारल्याने चेंडू लागला हाेता. त्यामुळेच आता गाेलंदाजांसाठी खास हेल्मेट तयार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...