आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना गुरूवारपासून मीरपूर येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेत १-० अशी आघाडी घेत भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचा दावा मजबूत करण्यासाठी या सामन्यातील विजयही आवश्यक आहे. या सामन्यात टीम इंडियाला त्यांच्या फिरकीपटूंकडून सर्वाधिक आशा असतील. येथे झालेल्या २३ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी २६४ बळी घेतले, तर फिरकीपटूंनी ४०९ बळी घेतले आहेत. खेळपट्टी पाहता, गेल्या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू कुलदीप यादव पुन्हा एकदा प्रभावी ठरू शकतो. आर. अश्विन आणि अक्षर पटेल यांनाही प्रभाव पाडण्याची संधी असेल. शेर-ए-बांगला मैदानावर भारताचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. २००७ व २०१० मध्ये येथे खेळलेले दोन्ही कसोटी सामने अनुक्रमे डाव व २३९ धावा आणि १० गड्यांच्या मोठ्या फरकाने जिंकले. मात्र, पुढील सामन्यात भारतीय फलंदाजांपुढे आव्हान कायम राहिल.
राहुल झाला जखमी, ईश्वरन करू शकतो पदार्पण
दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या केएल राहुलचे या सामन्यात खेळणे साशंक आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याला दुखापतीची बातमी मिळाली आणि जर तो फिट नसेल तर संघ चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वात खेळेल. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकते. पुजारा कर्णधार झाला, तर कर्णधार म्हणून भारतासाठी हा त्याचा पहिलाच सामना असेल. पुजाराला कसोटीत ७००० धावा पूर्ण करण्याचीही संधी आहे. जर त्याने १६ धावा केल्या, तर तो कसोटीत हा आकडा गाठणारा आठवा भारतीय फलंदाज ठरेल.
राष्ट्रीय विक्रमापासून अक्षर पटेल केवळ सहा बळी दूर
अक्षर पटेलला या सामन्यात सर्वात जलद ५० बळी घेणारा भारतीय खेळाडू बनण्याचीही संधी आहे. अक्षरने ७ सामन्यांत ४४ बळी घेतले आहेत. या कसोटीत त्याने ६ बळी घेतल्यास तो जगातील सर्वात वेगवान ५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचेल. तो भारताच्या आर. अश्विनचा (९ सामने) विक्रम मोडू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.