आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:श्रीसंतच्या 15 वर्षांनंतर वनडेत पाच विकेट; विदर्भाची मध्य प्रदेशवर चार गड्यांनी मात

बंगळुरू/इंदूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विजय हजारे ट्रॉफी : केरळची उत्तर प्रदेशवर ३ गड्यांनी मात; विदर्भाकडून यजमान मध्य प्रदेश संघाचा पराभव

मॅच फिक्सिंगप्रकरणी शिक्षा भाेगून अालेला वेगवान गोलंदाज श्रीसंत अाता बीसीसीआयच्या स्पर्धेदरम्यान क्रिकेटच्या मैदानावर उतरला. त्याने विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत केरळच्या विजयात माेलाचे योगदान दिले. त्याने सामन्यात धारदार गोलंदाजी करताना पाच बळी घेतले. त्याने करिअरमध्ये तब्बल १५ वर्षांनंतर वनडेत बळींचा पंच मारला. यापूर्वी त्याने २००६ मध्ये पहिल्यांदा वनडेत पाच बळी घेतले हाेते. केरळने साेमवारी उत्तर प्रदेश टीमवर तीन गड्यांनी मात केली. उत्तर प्रदेशने २८३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात केरळने ७ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य सहज गाठले.

विदर्भ संघ विजयी ट्रॅकवर :
कर्णधार फझलच्या (४३) नेतृत्वात विदर्भ संघ विजय हजारे ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत विजयी ट्रॅकवर अाला. या संघाने साेमवारी स्पर्धेच्या ब गटातील अापल्या दुसऱ्या सामन्यात यजमान मध्य प्रदेश टीमवर मात केली. विदर्भाने ४ गड्यांनी सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेश टीमने ९ बाद २४३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात विदर्भाने ४८.५ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात विजयश्री खेचून अाणली. संघाच्या विजयामध्ये गणेश सतीश (४७), यश राठाेड (३९) अाणि आदित्य सरवटे (नाबाद ३९) यांनी माेलाचे याेगदान दिले.

बातम्या आणखी आहेत...