आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर 4 गडी राखून विजय ; श्रीलंकेचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

शारजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी आशिया चषक टी-२० मध्ये सुपर-४ फेरीतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला ४ गडी राखून पराभूत केले. श्रीलंकेने १९.१ षटकांतच श्रीलंकेने अफगाणिस्तानने दिलेले लक्ष्य पूर्ण केले. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून १७५ धावांचे लक्ष्य श्रीलंकेसमोर ठेवले होते. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाचव्याच षटकात दिलशान मधुशंकाने अफगाणी संघ ४६ धावसंख्येवर असताना जाजईचा (१३) त्रिफळा उडवला.

गुरबाज आणि इब्राहिम (४०) यांनी दुसऱ्या गड्यासाठी नाबाद ३७ धावा केल्या. गुरबाजने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरमधील पाचवे शतक झळकावले. सलामीला आलेल्या रहमानुल्लाह गुरबाजने ४५ चेंडूंत ८४ धाव्या कुटल्या. श्रीलंकेच्या पाथुम निसंकाने ३५, कुसल मेंडिस ३६, चेरिस असलंका ८, दनिष्का गुणातिलाका ३३, दसून शनाका १०, भानुका राजपक्षे ३१, वानिंदू हसरंगाने १६ तर चामिका करुणारत्नेने ५ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

बातम्या आणखी आहेत...