आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक संकटामुळे सध्या श्रीलंकेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अडचणीत सापडले आहे. हाच धाेका लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेच्या मायदेशातील आयोजनासाठी आता पुढाकार घेतला. त्यामुळे हा आशिया चषक भारतामध्ये होणार आहे. बीसीसीआयची एक टीम आशिया कप आयोजनावर सध्या काम करत आहे. नुकतीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे एशियन क्रिकेट काैन्सिलच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली. यातून भारताचा आशिया कप आयोजनाचा दावा प्रबळ मानला जाताे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी यूएईनेही कंबर कसली आहे. येत्या २९ मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे. या दरम्यान श्रीलंकन क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आशिया कप आयोजनावर चर्चा केली जाईल. त्यानंतर जूनमध्ये यजमानपदाच्या नावावर शिक्का मोर्तब होईल. वेळापत्रकानुसार स्पर्धा २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित आहे. मात्र, आता या वेळापत्रकात आठवडाभराचा बदल होऊ शकेल.
दुसऱ्यांदा यजमानपद : भारतीय संघाने आतापर्यंत सर्वाधिक सात वेळा आशिया कप आपल्या नावे केला आहे. मात्र, भारतामध्ये फक्त एकदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १९९०-९१ दरम्यान भारतात झाली. यादरम्यान यजमान भारतीय संघ घरच्या मैदानावरही किताब विजेता ठरला होता. आता दुसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची तयारी बीसीसीआयने दर्शवली आहे.
पाक टीम सहभागी; एकाच मैदानावर सामने
मोजक्याच मैदानावर सामने आयोजनाचा हा प्रयोग यंदाच्या आयपीएलमध्ये यशस्वी झाला. या धर्तीवर आशिया कप आयोजन करण्याची प्लॅनिंग बीसीसीआयने केली. स्पधॅेत पाकिस्तान संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे काहीसे वादंग निर्माण होत आहे. त्यामुळे एकाच मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यावर एकमत होत आहे.
टी-२० वर्ल्डकपसाठी मोठा फायदा
टीम इंडियाची नजर टी-२० विश्वचषकातील सर्वाेत्तम कामगिरीवर आहे. यासाठीच मंडळाने आशिया कपचे आयोजन मायदेशात करण्यावर अधिक फाेकस केला आहे. त्यामुळे टीम इंडियाची आशिया कपमधूनच वर्ल्डकपची तयारी पूर्ण होऊ शकेल. यंदा ऑक्टाेबर-नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.