आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया चषक:श्रीलंकेचा बांगलावर 2 गडी राखून विजय

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया चषकात श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव करून विजयाचे खाते उघडले. कुशल मेंडीस (६०) आणि दासुन शनाका (४५) यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर त्यांनी बांगलादेशचा २ गडी आणि ४ चेंडू राखून पराभव केला. १८४ धावांचे मोठे आव्हान लंकेने ८ गडी गमावून शेवटच्या षटकात गाठले. मेंडीसने ४ चौकार आणि ३ षटकार खेचून ३७ चेंडूत ६० धावा तडकावल्या. तर शनाकाने ३३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा चोपल्या. तत्पूर्वी, बांगलादेशने श्रीलंकेसमोर १८४ धावांचे तगडे आव्हान उभे केले. नाणेफेक हरल्यानंतर बांगलादेशच्या एकाही खेळाडूने शतक, अर्धशतक न ठोकता हे आव्हान उभे केले.

बातम्या आणखी आहेत...