आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा खेळावर परिणाम:श्रीलंकेत आयपीएल खेळवण्याचा कोणताच प्रस्ताव मिळाला नाही, लॉकडाउन संपेपर्यंत टुर्नामेंट होणार नाही- बीसीसीआय

स्पोर्ट डेस्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिकेट श्रीलंकाचे अध्यक्ष म्हणाले- 'आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला 50 कोटी डॉलरपेक्षा जास्ती नुकसान होईल'

कोरोना व्हायरस महामारीमुळे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने आयपीएलच्या 13 च्या पर्वाला पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याची गुरुवारी अधिकृत घोषणा केली आहे. यानंतर क्रिकेट श्रीलंका(एसएलसी) ने हा टूर्नामेंट त्यांच्या देशात खेळवण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतू, याप्रकारचा कोणताच प्रस्ताव मिळाला नसल्याचा खुलासा बीसीसीआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने केला आहे. ते म्हणाले की, श्रीलंकेत आयपीएल खेळवण्याचा कोणताच प्रस्ताव मिळाला नाही, संपूर्ण जगात लॉकडाउन असेपर्यंत टुर्नामेंट होणे शक्य नाही.

यापूर्वीच एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी गुरुवारी म्हटले होते की, "आमच्या देशात भारतापेक्षा जास्त वेगाने परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यामुळे आम्ही आमच्या देशात आयपीएलचे आयोजन करू शकतोत. यायासाठी आम्ही लवकरच बीसीसीआयला एक पत्र लिहणार आहोत.''

परदेशात आयपीएल खेळवण्याचे अनेक पर्याय

2009 मध्ये लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल दक्षिण आफ्रीका आणि 2014 मध्ये यूएईमध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा हे सीनियर अधिकारीदेखील तेव्हाच्या बीसीसीआय टीममध्ये सामील होते. ते म्हणाले, ''श्रीलंका आयसीसीमध्ये भारतासोबत होता. त्यांचा प्रस्ताव समजू शकतो. अद्याप दुसऱ्या देशात आयपीएल खेळवण्यावर चर्चा झाली नाही, पुढील महिन्यात यावर चर्चा होऊ शकते.'' 

'दुसऱ्या देशात आयपीएल खेळवल्याने नुकसान कमी होईल'

सिल्वा म्हणाले, ''आयपीएलला रद्द केल्यामुळे बीसीसीआय आणि त्यांच्या स्टॉक होल्डर्सला 50 कोटी डॉलरपेक्षा जास्तीचे नुकसान सोसावे लागेल. बोर्ड दुसऱ्या कोणत्या देशात आयपीएल खेळवून नुकसान कमी करू शकतो. जर आयपीएल श्रीलंकेत झाला, तर भारतीय प्रेक्षकांसाठी टीव्हीवर सामने पाहणे सोपे जाईल. बीसीसीआयने यापूर्वीही दक्षि आफ्रीका आणि युएईमध्ये आयपीएल खेळवला आहे. आम्ही बीसीसीआयच्या उत्तराची प्रतिक्षा करू. जर बीसीसीआयने आमच्या देशात टुर्नामेंट खेळवण्यास होकार दर्शवला, तर आम्ही पूर्ण सुविधा पुरवण्यास तयार आहोत. यातून श्रीलंका क्रिकेटलाही काही फायदा होईल.''

बातम्या आणखी आहेत...