आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मिथ म्हणाला- WTC फायनलमध्ये पोहोचल्याचा मला आनंद:म्हणाला- मला भारतात कर्णधारपद भूषवायला खूप आवडते, पुढचा सामनाही जिंकू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारतात 5 पैकी 2 कसोटी जिंकल्या आहेत. - Divya Marathi
स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारतात 5 पैकी 2 कसोटी जिंकल्या आहेत.

गुरुवारी झालेल्या इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 गडी राखून पराभव केला. भारताने 76 धावांचे लक्ष्य दिले होते, जे ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमावून पूर्ण केले. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने संघाचे नेतृत्व केले. 2004 नंतर ऑस्ट्रेलियाने भारतात दुसऱ्यांदा कसोटी जिंकली. विशेष म्हणजे संघांने स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली दोन्ही कसोटीत विजय मिळवला आहे.

सामना जिंकल्यानंतर स्टीव्ह स्मिथ म्हणाला - मला भारतात कर्णधारपदाची धुरा सांभाळायला खूप जास्त आवडते कारण मला येथील परिस्थिती चांगली समजते. सामन्यातील प्रत्येक चेंडूवर माझा उत्साह वाढतच गेला. मी या आठवड्यात माझ्या कामावर खूश आहे. WTC फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. मला आशा आहे की संघ शेवटचा सामनापण नक्की जिंकेल आणि आम्ही मालिकेत 2-2 अशी बरोबरी करू.

बातमीमध्ये पुढे जाण्यापूर्वी, स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाची भारतातील कामगिरी पाहू.

आता स्टीव्ह स्मिथने काय म्हटले ते पॉइंट्समध्ये जाणून घेऊ या..

  • नाणेफेक गमावूनही पहिल्या डावात चमकदार कामगिरी - स्मिथने सांगितले की, पहिल्या दिवशी नाणेफेक गमावूनही आमच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारतावर दबाव आणला. कुहनेमनने पहिल्या दिवशी शानदार गोलंदाजी केली. त्याने सर्वांना त्याच्या खेळीने आश्चर्यचकित केले.
  • मॅचदरम्यान कमिन्सबद्दल विचार करत होता - स्मिथ म्हणाला की, मी मॅचदरम्यान आमचा कर्णधार पॅट कमिन्सबद्दल विचार करत होतो. त्याला अचानक घरी जावे लागले. माझ्या सहानुभूती त्याच्यासोबत आहेत. त्याच्या अनुपस्थितीत मला कर्णधारपदाची संधी मिळाली. या संधीचा मी पुरेपूर फायदा घेतला.
  • दिल्ली कसोटीतील चुकांमधून शिकलो - स्मिथ म्हणाला की, इंदूरमध्ये आम्हाला जिंकण्याची संधी होती जी आम्ही गमावली नाही. दिल्ली कसोटीतील चुकांमधून आम्ही शिकलो आणि त्या इथे सुधारल्या. 10 पेक्षा जास्त दिवसांच्या अंतराने आम्हाला तयारीसाठी वेळ मिळाला आणि त्याचाच फायदा झाला.
  • भारताने दुसऱ्या दिवशी शानदार गोलंदाजी केली - दुसऱ्या दिवशी भारताने शानदार गोलंदाजी केली. आमची टीम त्या दिवशी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्याचवेळी भारताकडून चेतेश्वर पुजाराने शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी भारताच्या बॅटिंग लाईनला रोखण्याचे उत्तम काम केले.
सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 49 धावांची नाबाद खेळी खेळली.
सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 49 धावांची नाबाद खेळी खेळली.

2 दिवसांच्या खेळात 30 विकेट्स पडल्या

इंदूर कसोटीत एकूण 31 विकेट पडल्या. त्यापैकी 30 दुसऱ्या दिवशीच पडल्या होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे 31 पैकी केवळ चार विकेट वेगवान गोलंदाजांच्या खात्यात आल्या. बाकीचे एकतर धावबाद झाले. किंवा स्पिनर्सचे बळी ठरले.

शुक्रवारी तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य मिळाले. मार्नस लबुशेनने अश्विनच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. ट्रॅव्हिस हेड 49 आणि मार्नस लॅबुशेन 28 धावांवर नाबाद राहिले.

तत्पूर्वी, भारताने दुसऱ्या डावात 163 धावा करून 75 धावांची आघाडी घेतली, तर ऑस्ट्रेलियाने 197 धावा करून पहिल्या डावात 88 धावांची आघाडी घेतली होती. भारताचा पहिल्या डावात केवळ 109 धावांमध्ये आटोपला होता.

पुढील कसोटी अहमदाबादमध्ये

इंदूरमधील विजयासह कांगारू संघाने चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या मालिकेतील शेवटचा सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.

तसेच वाचा क्रिकेटशी संबंधित या बातम्या.

WTC फायनलची प्रतीक्षा वाढली

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 9 विकेट्सनी पराभव झाला. फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे भारतीय संघाने अडीच दिवसात सामना गमावला.

या पराभवामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची प्रतीक्षाही लांबली आहे. या स्टोरीमध्ये, भारतासाठी WTC मध्ये पुढे जाण्यासाठी कोणती समीकरणे आहेत आणि अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...