आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
73 वर्षीय माजी भारतीय सलामीवीर म्हणाले- 'या पराभवानंतर टीम इंडियाचे अनेक मोठे खेळाडू निवृत्त होऊ शकतात आणि हार्दिक पंड्याकडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते.'
गुरुवारी अॅडलेडमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर गावस्कर म्हणाले- 'मला टीम इंडियाच्या लाइनअपमध्ये अनेक बदलांची अपेक्षा आहे. संघातील काही खेळाडू 30 ते 40 वयोगटातील आहेत. जे भारतीय टी-20 आंतरराष्ट्रीय संघातील त्यांच्या स्थानावर पुनर्विचार करत असतील.'
त्यांनी पंड्याला पुढील कर्णधार म्हणून नामित करताना म्हटले- 'वर्ल्डकपनंतर पंड्या भारतीय संघाची धुरा सांभाळेल.'
हार्दिकने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या असाइनमेंटमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये यश मिळवले आहे.
नॉकआऊटमध्ये अपयशी ठरली टीम
माजी सलामीवीर गावस्कर यांनी आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीबद्दलही सांगितले. ते म्हणाले- 'मला वाटतं की भारत या बाद फेरीत चांगली कामगिरी करू शकला नाही. विशेषतः फलंदाजी आणि हीच फलंदाजी भारतीय संघाची ताकद आहे.'
टीम इंडिया गेल्या 9 वर्षांपासून नॉकआउट मॅच हरत आहे. संघाने 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली होती.
इंग्लंडने 10 गडी राखून पराभव केला
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. भारताचे 168 धावांचे लक्ष्य इंग्लंडचा सलामीवीर जोस बटलर (49 चेंडूत नाबाद 80) आणि अॅलेक्स हेल्स (47 चेंडूत नाबाद 86) यांनी 16 षटकांत पूर्ण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.