आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीबद्दल जोरदार टीका केली, ते म्हणाले, 'खेळपट्टीने त्यांच्या मनावर वर्चस्व गाजवले'. पहिल्याच चेंडूपासून टीम इंडिया संघावर कांगारूंचे स्पिनर्स वरचढ ठरले, त्यांनी दोन्ही डावात त्यांना 109 आणि 163 धावांमध्येच गुंडाळले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशीच हा सामना 9 गडी राखून जिंकला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल साठी पात्र ठरले.
गावसकर यांनी एका स्पोर्ट्स वृत्तवाहिनीला सांगितले की, 'फलंदाजांनी त्यांच्या प्रतिभेला योग्य असा न्याय दिला नाही. जर तुम्ही भारतीय विकेट्सच्या पडझडीवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय फलंदाजांनी त्यांच्याच चुकांमुळे विकेट गमावल्या. ते असे फटके खेळत होते की खेळपट्टीवरून येणारा चेंडू हा कसा येईल याचा अंदाज त्यांना आधीच येत होता.
गावस्कर म्हणाले, “तुमच्या लक्षात आले असेल की, भारतीय फलंदाजीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसली. कारण नागपूरमध्ये शानदार शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माशिवाय पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियातल्या खेळाडूंनी धावा केल्या नाहीत. जेव्हा तुमच्या खात्यात कमी धावा असतात तेव्हा फलंदाजीत तुम्ही अस्थिर असता.
गावस्कर म्हणाले, 'ते खेळपट्टीवर चेंडूच्या जवळ जाऊ शकले नाहीत. त्यांच्यावर खेळपट्टीनेच वर्चस्व गाजवले. खेळपट्टीनेच त्याच्या मनावर पहिल्या डावातच वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. हा प्रभाव दुसऱ्या डावात अधिक होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.