आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावस्करांचा प्रश्न - 300 धावा काढणारा अनफिट कसा:म्हणाले, तुम्हाला स्लिम क्रिकेटर हवा असेल तर फॅशन शोमध्ये जा

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मुंबईचा क्रिकेटर सरफराज खानची टीम इंडियात निवड न झाल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. त्याने चेतन शर्माच्या निवड समितीला फटकारले आणि म्हटले की, जर तुम्हाला संघात स्लिम-ट्रिम क्रिकेटर हवा असेल तर फॅशन शोमध्ये जा आणि तेथून आणा. सरफराज त्याच्यासाठी पूर्णपणे फिट आहे. तो अनफिट असता तर त्याला त्रिशतक झळकावता आले नसते.

शरीर पाहून निवड करता का?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय कसोटी संघात सरफराजची निवड झाली नव्हती. सरफराजला फिटनेसमुळे बाजूला करण्यात आल्याच्या बातम्या मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आल्या होत्या. त्याचवेळी ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनसारख्या आक्रमक फलंदाजांची संघात निवड करण्यात आली.

यावर गावस्कर म्हणाले की, खेळाडूची निवड ही त्याची शरीरयष्टी किंवा उंची पाहून करता कामा नये. जर एखादा खेळाडू सलग 3 रणजी हंगामात 100 पेक्षा जास्त सरासरीने 900 धावा करत असेल तर तो अनफिट असूच शकत नाही. सरफराज माझ्यासाठी योग्य आहे. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टीम इंडियाच्या संघात असला पाहिजे.

अनफिट क्रिकेटर त्रिशतक कसा करू शकतो?

एका मुलाखतीत गावस्कर म्हणाले, 'जर खेळाडू अनफिट असेल तर तो दिवसअखेरीस शतक पूर्ण करू शकणार नाही. सरफराजने यापूर्वीच त्रिशतक झळकावले आहे. BCCI ने यो-यो चाचणीला फिटनेसचे मापदंड बनवले आहे. शतक झळकावूनही सरफराज फिल्डिंगला येतो. त्यामुळे क्रिकेटसाठी तो किती योग्य आहे हे त्याने सिद्ध केले.

'बॅट आणि बॉल मॉडेलकडे सोपवा'

गावसकर इथेच थांबले नाहीत, तर ते पुढे म्हणाले की BCCI च्या निवड समितीला स्लिम आणि ट्रिम मुलेच हवी असतील तर. मग त्यांनी फॅशन शोमध्ये जाऊन काही मॉडेल्स निवडून त्यांना बॅट-बॉल देऊन क्रिकेटपण खेळू दिलं पाहिजे तसेच त्यांचाही संघात समावेश करावा. तुमच्याकडे सर्व अंगकाठीचे क्रिकेटर्स आहेत, त्याच्या आकारावर जाऊ नका. धावा आणि विकेट घेण्याच्या क्षमतेवर संघ निवड करा.

सरफराजने 3 दिवसांपूर्वी दिल्लीविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये 13वे शतक झळकावले होते. त्याची खेळी इथे पाहा…

सरफराज 2019 पासून सतत धावा काढत आहे

सरफराज खान 2019 च्या रणजी ट्रॉफी हंगामापासून मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावा करत आहे. त्या हंगामातील 6 सामन्यांमध्ये त्याने 154.66 च्या सरासरीने 928 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतकेही होती. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 301 धावांची खेळीही निघाली.

2020-21 चा रणजी हंगाम कोविड-19 महामारीमुळे होऊ शकला नाही. 2021-22 च्या हंगामात रणजी ट्रॉफी परत येताच सरफराजने पुन्हा धावा केल्या. या हंगामातील 6 सामन्यांमध्ये त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. संघाने स्वबळावर अंतिम फेरी गाठली. मुंबई फायनल हरली, पण सरफराज खानला प्लेयर ऑफ द सीझन म्हणून गौरवण्यात आलं.

इंडिया-A साठी खेळला 4 सामने

सरफराज खानने भारत-ए संघाकडून आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्याच्या 7 डावात त्याने 34.16 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतक आले आणि गोलंदाजीतूनही त्याने 5 बळी घेतले.

अलीकडे बांगलादेशविरुद्धच्या A मालिकेत तो विशेष काही करू शकला नाही. पण, दक्षिण आफ्रिकेच्या कठीण परिस्थितीत त्याने नाबाद 71 धावांची खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 37 सामन्यांमध्ये 13 शतके आहेत.

बातम्या आणखी आहेत...