आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Sunil Gavaskar's Contribution Of 35 Lakh To The Center And 24 Lakh To The State To Fight With Corona

कोरोना संकट:सुनिल गावस्कर यांची केंद्राला 35 आणि राज्याला 24 लाखांची मदत, मुलगा म्हणाला- त्यांनी देशासाठी 35 आणि मुंबईसाठी 24 शतक ठोकले आहेत

स्पोर्ट डेस्क3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावस्करांनी 125 टेस्टमध्ये 34 शतकांच्या मदतीने 10 हजार 122 रन आणि 108 वनडेमध्ये 1 शतकासोबत 3हजार 92 धावा केल्या आहेत

कोरोना व्हायरसविरोधात लढाई लढण्यासाठी क्रिडा क्षेत्रातील अनेकजण पुढे येत आहेत. यातच माजी भारतीय कर्णधार सनील गावस्कर यांनी 59 लाख रुपयांचे दान केले आहे. या गोष्टीचा खुलासा माजी क्रिकेटर अमोल मजूमदार यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, गावस्करांनी पंतप्रधान मदत निधीत 35 लाख रुपये आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीत 24 लाख रुपयांचे दान केले आहे. यावर सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन म्हणाला की, ''त्यांनी देशासाठी 35 आणि मुंबईसाठी 24 शतक लगावले आहेत, म्हणून ही रक्कम निवडली आहे.'' गावस्कर यांनी 125 टेस्टमध्ये 10 हजार 122 धावा काढल्या आहेत. यात त्यांनी 34 शतक आणि 45 अर्द्धशतक लगावले आहेत. तसेच, त्यांनी  108 वनडेमध्ये 1 शतक आणि 27 अर्द्धशतकांच्या मदतीने 3 हजार 92 धावा काढल्या आहेत. याशिवाय 348 फर्स्ट क्लास सामन्यात 81 शतकांच्या मदतीने 25हजार 8 34 रन काढले आहेत. 

पुजारासह अनेकांनी केली मदत

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने डॉक्टर, पॅरा मेडिकल स्टाफ आणि पोलिसांसर सर्व फ्रंट-लाइन वॉरियर्सना धन्यवाद केले आहे. त्याने ट्वीट केले, ‘‘माझे कुटुंब आणि मी पीएम CARES फंड आणि गुजरात CM मदन निधीत माझे योगदान केले आहे, आशा करतो की, तुम्हीदेखील कराल.’’ पुजाराशिवाय सचिन तेंडुंलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सौरव गांगुली, सुरेश रैना, युवराज सिंह, गौतम गंभीर, हरभजन सिंहसह अनेकांनी मदत केली आहे.

बातम्या आणखी आहेत...