आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आम्रपाली ग्रुप आणि एमएस धोनी यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे हे प्रकरण आहे...याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
एमएस धोनीचे आम्रपाली ग्रुपवर150 कोटी रुपये थकीत आहेत, तर दुसरीकडे, समूहाच्या ग्राहकांना त्यांचे फ्लॅट मिळत नसल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.
आम्रपाली ग्रुप आणि महेंद्रसिंग धोनीशी संबंधित हे प्रकरण यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात सुरू होते, जिथे उच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती.निवृत्त न्यायमूर्ती वीणा बिरबल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचे काम सुरू आहे.
समिती स्थापन झाल्यानंतरच हे प्रकरण पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात नेले होते.सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आम्रपाली समूहाकडे निधीची कमतरता असल्याचा युक्तिवाद पीडितांच्या वतीने करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्याकडे बुक केलेले फ्लॅट उपलब्ध नाहीत.
पीडितांनी कोर्टात दिलेला हा युक्तिवाद
महेंद्रसिंग धोनीने दिल्ली उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीसमोर आपली 150 कोटींची थकबाकी आम्रपाली ग्रुपकडे असल्याचे सांगीतले आहे. महेंद्रसिंग धोनी हा आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता आणि यासाठी त्याला 150 कोटी मिळणार होते.
तर पीडितांचे म्हणणे आहे जर आता आम्रपाली ग्रुपने एमएस धोनीची थकबाकी भरण्यासाठी पैसे खर्च केले तर ग्राहकांना त्यांचे फ्लॅट मिळणार नाहीत, असा युक्तिवाद पीडितांच्या वतीने करण्यात आला आहे
या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने महेंद्रसिंग धोनी आणि आम्रपाली ग्रुपला नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप लवाद समितीच्या सुनावणीला किंवा कोणत्याही प्रकारच्या कारवाईला स्थगिती दिलेली नाही.
आम्रपाली ग्रुप आणि एमएस धोनी यांच्यात काय संबंध आहे?
वास्तविक, आम्रपाली ग्रुपवर त्यांच्या अनेक ग्राहकांना अद्याप फ्लॅट न दिल्याचा आरोप होता.पैसे घेऊनही प्रकल्प पूर्ण न झाल्याने प्रकरण न्यायालयात पोहोचले. या काळात महेंद्रसिंग धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अॅम्बेसेडर होता. त्याने आम्रपाली ग्रुपच्या अनेक जाहिरातीही शूट केल्या आहेत.
2016 मध्ये नोएडामध्ये आम्रपाली ग्रुपच्या काही प्रोजेक्ट्सबाबत ग्राहकांनी तीव्र निदर्शनं केली होती, त्यावेळी सोशल मीडियावर एमएस धोनीच्या विरोधात मोहीम देखील चालवली गेली. या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात एमएस धोनीने आम्रपाली ग्रुपच्या ब्रँड अॅम्बेसेडरमधून आपले नाव काढून घेतले.
मात्र, काही काळानंतर हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना आणि समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर एमएस धोनीने अर्ज केला होता की तो आम्रपाली ग्रुपवर धोनीचे 150 कोटी रुपये थकित आहे, जे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्याची फी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.