आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Suresh Raina, Part Of Road Safety Series, Says Practice Has Started, I'm Ready To Show My Strength Against India Legends At Green Park

सुरेश रैना रोड सेफ्टी सिरीजचा बनला भाग:म्हणाला - सराव सुरू..., ग्रीन पार्कमध्ये इंडिया लीजेंड्सकडून माझी ताकद दाखवण्यासाठी मी तयार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना हा रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये खेळणार असून तो इंडिया लीजेंड्स संघाचा भाग बनला आहे. गुरुवारी त्याने पहिल्या सामन्यासाठी सराव देखील सुरू केला. त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मंगळवारी रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, यावेळी त्याने भारताबाहेरील इतर लीगमध्ये खेळणार असल्याचेही सांगीतले आहे.

सुरेश रैनाने दिव्य मराठीशी केलेल्या खास बातचित मध्ये सांगितले की, तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडियन लीजेंड टीमचा एक भाग बनला आहे. त्यासाठी त्याने सरावही सुरू केला आहे. सिरीजमध्ये तो आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

या सिरीजचे संयोजक अनस बकाई यांनी माहिती देताना सांगितले की, सुरेश रैना वर्ल्ड सिरीजमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. बुधवारी त्याने इंडिया लिजेंड्स संघात सामील होण्याचे मान्य केले. वीरेंद्र सेहवागच्या जागी रैनाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी सेहवागच्या दमदार खेळीमुळे भारत चॅम्पियन झाला होता

गेल्या वर्षी वीरेंद्र सेहवागच्या जोरावर इंडिया लिजेंड्स चॅम्पियन बनले होते, पण काही कारणामुळे तो या हंगामात इंडिया लिजेंड्स भाग असणार नाही. त्यामुळे स्पर्धेचे स्वरूप पाहता टीमला स्फोटक फलंदाजाची गरज भासू लागली होती. जो फक्त सुरेश रैना मधल्या फळीत युवराजसोबत पूर्ण करू शकतो. त्याचा संघात समावेश झाल्यानंतर आता भारतीय टीम सिरीज जिंकण्याची शक्यता आणखी वाढली आहे.

सुरेश रैनाने कानपूरला येताना हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
सुरेश रैनाने कानपूरला येताना हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

रैनासाठी खास आहे ग्रीन पार्क...

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजसाठी सुरेश रैनाचे खेळणे हे प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठे आव्हान असणार आहे कारण सुरुवातीचे दोन सामने कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर होणार आहेत. विशेष म्हणजे ग्रीनपार्क हे रैनाचे होम ग्राउंड असण्यासोबतच ते त्याच्यासाठी खूप लकी आहे. रैनाने येथील IPL च्या नवव्या हंगामात गुजरात लायन्स संघाचे नेतृत्व केले होते.

येथे त्याच्या टीमने KKR आणि MI सोबतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. यासोबतच रैनाने इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क येथे खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20 इंटरनॅशनल शानदार खेळी खेळत सामन्यात 23 चेंडूत 34 धावा केल्या.

बातम्या आणखी आहेत...