आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T-20 रॅंकिंगमध्ये सूर्या अव्वलस्थानी कायम:ताज्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 890 गुण, विराटची दोन स्थानावरून घसरण

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव ICC च्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज आहे. गेल्या आठवड्यातही तो अव्वल होता. यावेळी त्याचे रेटिंग गुण वाढले आहेत. सूर्याचे 890 रेटिंग गुण आहेत. गेल्या आठवड्यात त्याचे 859 गुण होते. विराट कोहलीला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 836 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन हा जगातील नंबर 1 अष्टपैलू खेळाडू आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T-20 मध्ये शतक झळकावले

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवने सर्वाधिक धावा केल्या. 2 सामन्यात त्याच्या बॅटमधून 124 धावा निघाल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे. सरयाने दुसऱ्या टी-20 सामन्यात शतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले.

विराट कोहलीला दोन स्थानांचे नुकसान

टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहलीला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. कोहली आता 650 गुणांसह 13 व्या क्रमांकावर आहे. केएल राहुल 582 गुणांसह 19व्या स्थानावर आहे. अशाप्रकारे भारताचे तीन फलंदाज टॉप 20 मध्ये आहेत.

गोलंदाजीत भुवी सर्वोच्च स्थानी असलेला भारतीय

गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार 647 गुणांसह 13व्या स्थानावर आहे. तो ICC रॅकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी असलेला भारतीय गोलंदाज आहे. अर्शदीप सिंग 616 गुणांसह 21व्या तर रविचंद्रन अश्विन 606 गुणांसह 21व्या क्रमांकावर आहे. युजवेंद्र चहल 532 गुणांसह 43व्या स्थानावर आहे.

बातम्या आणखी आहेत...