आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Suryakumar Yadav Creates History; Suryakumar Yadav ICC Men's T20 Player Of The Year 2022 Update | Sport News

सूर्यकुमार ठरला ICC मेन्स टी-20 प्लेयर ऑफ द इयर:हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय फलंदाज

दुबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव ICC मेन्स टी-20 प्लेयर ऑफ द इयर ठरला आहे. हे स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी ही घोषणा केली. इंग्लिश फलंदाज सॅम कुरन, पाकिस्तानी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा हेदेखील ICCच्या विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये होते.

सर्वप्रथम ग्राफिक्समध्ये पाहा या किताबाचे दावेदार…

आता जाणून घ्या ICCचे भारतीय पुरस्कार विजेते

आता जाणून घ्या सूर्यकुमारची 2022 मधील टी-20 कामगिरी

2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 चा टॉप स्कोअरर

सूर्यकुमार 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 31 सामन्यांत 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

एकाच वर्षात या फॉरमॅटमध्ये 1000 हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने 2021 मध्ये 26 डावांत 1326 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सूर्याने 2022 मध्ये 68 टी-20 षटकारही ठोकले आहेत. जे या फॉरमॅटमधील एका वर्षातील सर्वाधिक आहेत.

टी-20 विश्वचषकात सर्वोच्च स्ट्राइक रेट

गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सूर्याचा सर्वाधिक 189.9 स्ट्राइक रेट होता. त्याने या स्पर्धेत 239 धावा केल्या. विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. विराट कोहली 296 धावा करत अव्वल स्थानावर होता. सूर्याने या स्पर्धेत 3 अर्धशतके झळकावली होती.

बातम्या आणखी आहेत...