आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Suryakumar Yadav In ICC Rankings Top 3: Hardik 5th In T20I, Bhuvi Drops 2 Places Due To Poor Performance

सूर्यकुमार यादव ICC क्रमवारीत टॉप-3 मध्ये:हार्दिक टी-20 मध्ये 5 व्या स्थानी, तर खराब कामगिरीमुळे भुवीची 2 स्थानांने घसरण

6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ICC ने बुधवारी T-20 रॅकिंग जाहीर केली. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 25 चेंडूत 46 धावांची खेळी करणारा भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा टॉप-3 मध्ये परतला आहे. तर 30 चेंडूत 71 धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याला 2 स्थानांचा फायदा झाला आहे.

आता तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. या सर्वांशिवाय चार षटकांत 52 धावा देणारा भुवनेश्वर कुमार गोलंदाजी क्रमवारीत 9व्या स्थानावर घसरला आहे. त्यांने 2 गुण गमावले आहेत.

बाबर आझमलाही बसला फटका

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमची बॅट सध्या काही विशेष करू शकली नाही. आशिया कपमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याचवेळी मंगळवारी खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यातही बाबरला मोठी खेळी करता आली नाही. अशा स्थितीत त्याला ICC क्रमवारीत फटका बसला असून तो तिसऱ्या स्थानावरून चौथ्या रॅंकवर गेला आहे. त्यांच्या जागी सूर्यकुमार यादव आला आहे.

हार्दिक पंड्याला झाला फायदा

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मात्र त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा फायदा झाला आहे. त्याने अष्टपैलूंच्या क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. त्याला दोन रॅंकिंगचा फायदा झाला असून तो 5 व्या क्रमांकावर आहे. हार्दिक पंड्याला एकूण 180 रेटिंग आहे, तर शाकिब अल हसन 248 रेटिंगसह अष्टपैलू खेळाडू म्हणून क्रंमाक एकवर आहे.

भुवनेश्वर कुमार रॅंकिंगमध्ये घसरला

आशिया चषक स्पर्धेत डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला दोन क्रंमाकाने खाली उतरावे लागले आहे. सातव्या क्रमाकावरून त्याला आता नवव्या क्रमांकावर यावे लागले.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 52 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

भुवनेश्वर कुमारचे 19 वे षटक टीम इंडियाला जड गेले आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. असे असूनही टी-20 क्रमवारीत अव्वल-10 मध्ये भुवनेश्वर हा एकमेव गोलंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...