आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टी-20 लीग:भारतीय खेळाडू सहा महिन्यांनंतर क्रिकेट खेळणार, खेळाडू यूएईमधून थेट ऑस्ट्रेलियाला हाेतील रवाना

मुंबई/दुबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
विंडीजचा स्फाेटक फलंदाज गेल अाणि रसेलने अायपीएलची तयारी सुरू केली आहे.
  • 19 सप्टेंबर रोजी होणार आयपीएल, 3 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात
  • 2 मार्चपासून भारतीय खेळाडू आहेत घरीच; आता 5 महिने देशाबाहेर राहतील दिग्गज खेळाडू
Advertisement
Advertisement

भारतीय खेळाडूंनी २ मार्चपासून क्रिकेट खेळलेले नाही. आता त्यांना १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणाऱ्या टी-२० आयपीएलमध्ये उतरावे लागेल. म्हणजे सहा महिन्यांनंतर खेळाडू सामना खेळतील. कोरोनामुळे खेळाडूंना बायो सुरक्षेत राहावे लागेल. त्यामुळे आयपीएलमधील जवळपास ३० खेळाडू यूएईमधून देशात परतणार नाहीत. ते थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होतील. दुसरीकडे, संघ ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत ४ कसोटी आणि ३ वनडे खेळणार आहे. खेळाडू ऑगस्टमध्ये यूएईत पोहोचतील.

ऑस्ट्रेलियामध्ये अखेरचा वनडे १७ जानेवारी रोजी खेळवला जाईल. म्हणजे अव्वल खेळाडू पाच महिने देशात परतणार नाहीत. माहितीनुसार आयपीएलची फायनल दिवाळी पाहता ८ ऐवजी १० नोव्हेंबर रोजी खेळवली जाऊ शकते. कारण प्रायोजकाला त्याचा फायदा मिळेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २५ पेक्षा अधिक खेळाडूंची निवड केली जाऊ शकते. कारण कोविड-१९ मुळे कोणता खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या जागी दुसऱ्याला संधी मिळेल. यापूर्वी विंडीज व पाकिस्तानचे देखील २५ पेक्षा अधिक सदस्य असलेली टीम इंग्लंड दौऱ्यात गेली होती. त्यासह संघाला कसोटी व वनडे दोन्ही मालिका खेळायच्या आहेत.

खेळाडूंच्या दोन आठवड्यांत ४ टेस्ट, विनाप्रेक्षक आयपीएल

आयपीएल गव्हर्निंग काैन्सिलची बैठक २ ऑगस्ट रोजी होईल. यात सर्व फ्रँचायझींना एसओपी बद्दल माहिती देण्यात येईल. मंडळाकडून बनवण्यात आलेल्या एसओपी नुसार सामन्यादरम्यान चाहत्यांची उपस्थिती नसेल. स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी खेळाडूंची चार वेळा कोविड-१९ चाचणी केली जाईल. दोन यूएई रवाना होण्यापूर्वी आणि दोन यूएईमध्ये क्वाॅरंटाइनदरम्यान होईल. एसओपीला इंग्लंड मंडळाप्रमाणे बनवण्यात आले आहे. त्यासह समालोचक कक्षात सहा फूट लांब बसतील आणि ड्रेसिंग रूममध्ये १५ पेक्षा अधिक खेळाडू नसतील. मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, एकादा बायो सुरक्षा व्यवस्थेत खेळाडू आल्यानंतर बाहेर जाण्याची परवानगी नसेल. खेळाडूंसोबत त्याची पत्नी किवा कुटूंब जाईल किंवा नाही हे मंडळ ठरवेल. त्याची जबाबदारी फ्रँचायझीला देण्यात येईल. मात्र, नियमांचे सर्वांना पालन करावे लागेल. याध्ये बसचालकाचाही समावेश आहे.

व्हर्च्युअल गेमिंग वर भर; क्रिकेटपेक्षा अधिक खेळणार ‘फिफा’

आयपीएलदरम्यान बायो सुरक्षेबाबत विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. अशात विश्रांतीच्या दिवशी खेळाडूंना हॉटेल बाहेर जाण्यास परवानगी नसेल. अशा परिस्थितीमध्ये सर्वच फ्रँचायझी आपल्या संघाचे खेळाडू रिकाम्या वेळेत व्यस्त राहण्यासाठी खास असे नियोजन करत आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले की, व्हर्च्युअल गेमवर लक्ष देणार आहे. खेळाडूंसाठी फिफा सारख्या खेळाची सुविधा हॉटेलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. आपल्याला दोन महिन्यांत अनेक खेळाडू क्रिकेट ऐवजी फिफा खेळताना दिसतील. त्यांना इनडोअर गेम्स सारख्या सुविधा देखील दिल्या जातील.

Advertisement
0