आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझटपट क्रिकेटच्या टी-२० या फाॅरमॅटमध्ये फलंदाजीच्या शैलीत केलेला बदल हा टीम इंडियासाठी अधिक फायदेशीर ठरला. यातूनच यजमान टीम इंडियाने शनिवारी इंग्लंडविरुद्ध निर्णायक पाचव्या टी-२० सामन्यात शानदार विजय संपादन केला. यासह टीमने मालिका ३-२ ने अापल्या नावे केली. यादरम्यान विराट कोहलीची फलंदाजी उल्लेखनीय ठरली. बुमराह अाणि रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीतही टीम इंडियाने अापल्या दर्जेदार फलंदाजीच्या बळावर टी-२० फाॅरमॅटमधील नंबर वन इंग्लंड टीमला धूळ चारण्याचा पराक्रम गाजवला. मैदानावर १५० किमी प्रती तासाच्या वेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असलेल्या जाेफ्रा अार्चर अाणि मार्क वूडचा सामना भारतीय फलंदाजांनी यशस्वीपणे केला. यातूनच टीमने अाता विश्वचषकासाठीचा अापला दावा मजबूत केला. टी-२० मध्ये विश्वविजेता हाेण्यासाठी अाता फलंदाजीची ही शैली अशीच कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. अाक्रमक खेळीमुळेच टीमला मालिका विजयाचे स्वप्न यशस्वीपणे साकारता अाले. याच्याच बळावर टीम वर्ल्डकप जिंकू शकणार अाहे.
संघामध्ये सहाव्या गोलंदाजाचा तिढा सुटला
भारतीय संघामध्ये हार्दिक पांड्या हा पाचव्या गाेलंंदाजांच्या भूमिकेत असायचा. मात्र, सपाट खेळपट्टी, धुके पडल्यानंतर विकेट पडणे कठीण हाेते. अशा परिस्थितीमध्ये संघासमोर अडचणीत वाढ होते. हीच परिस्थिती लक्षात घेऊन टीम इंडियाने शेवटच्या पाचव्या सामन्यात नटराजन अाणि सलामी सामन्यात अक्षर पटेलला सहाव्या गोलंदाजाच्या भूमिकेची संधी दिली हाेती. टीम इंडियाचा हा प्रयाेगही यशस्वी झाला. यातून अाता सहाव्या गाेलंदाजासाठीचा असलेला प्रश्नही अाता सुटल्याचे चित्र अाहे.
खेळाडूंकडे ४ दिवस विश्रांतीचा पर्याय
इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघातील खेळाडूंना चार दिवसांची विश्रांती मिळेल. मात्र, त्यानंतर आयपीएल संघात दाखल होण्यापूर्वी ७ दिवस क्वॉरंटाइन राहावे लागेल. बीसीसीआयकडून जाहीर एसओपीनुसार वनडे मालिकेत खेळत असलेल्या खेळाडूंना थेट जैवसुरक्षित वातावरणात प्रवेश मिळेल. मात्र, विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंना ही सूट मिळणार नाही. २३ मार्च रोजी सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना २८ मार्च रोजी खेळावा जाईल. आयपीएलची सुरुवात ९ एप्रिल रोजी होईल. विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंना १ एप्रिल रोजी फ्रँचायझीसोबत जोडण्यापूर्वी ७ दिवस क्वॉरंटाइन पूर्ण करावे लागेल. त्यामुळे आयपीएलच्या तयारीसाठी संधी मिळणार नाही. खेळाडूदेखील ताे पर्याय निवडण्याची शक्यता कमीच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.