आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20:नंबर-1 इंग्लंडसमोर यजमान भारताचे आव्हान, प्रक्षेपण सायंकाळी 7 वा. अहमदाबादमध्ये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान भारत व इंग्लंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात हाेणार आहे. आज सलामीच्या सामन्यात हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. याच मालिकेच्या माध्यमातून भारत व इंग्लंड संघ यंदा हाेणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात करणार आहेत. टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये भारत-इंग्लंड संघ तुल्यबळ आहेत, मात्र त्याच्या खेळण्याची पद्धत वेगळी आहे. भारतीय संघ संयम व समजदारपणे सुरुवात करतो. इंग्लंड पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळतो. भारताकडे सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत व हार्दिक पांड्या आहेत, जे अखेरच्या षटकांमध्ये धावगती वाढवतात. ईशान किशनदेखील प्रथमच संघासोबत आहे. गोलंदाजीत भुवनेश्वरकुमारने दुखापतीतून सावरत पुनरागमन केले. दीपक चाहर व शार्दूल ठाकूर आहेत, जे बॅटने शानदार कामगिरी करतात. नवदीप सैनी डाव सावरू शकतो. फिरकीसाठी चहल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया व अक्षर पटेल पर्याय आहेत. तेवतियाने आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी केली होती. त्यामुळे या मालिकेत त्याच्या खेळीवर सर्वांची नजर असेल.

४०४ दिवसांनी रोहित टी-२० खेळणार
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने अखेरचा टी २० आंतरराष्ट्रीय सामना गतवर्षी ४ फेब्रुवारी रोजी खेळला होता. दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान संघात नव्हता. कर्णधार कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, रोहित व राहुल जोडी संघाची सुरुवात करील. धवन तिसरा पर्याय असेल.

५९.९४ च्या सरासरीने रोहित-राहुलच्या धावा
झटपट फाॅरमॅट टी-२० मध्ये सलामीला राेहित शर्मा आणि राहुलने आतापर्यंत उल्लेखनिय खेळी केली आहे. सलामीच्या या जाेडीच्या नावे आतापर्यंत १८ डावामध्ये ५९.९४ च्या सरासरीने १०१९ धावांची नाेंद आहे. या दरम्यान दाेघांनी तीन वेळा शतकी आणि सात वेळा अर्धशतकी भागीदारी केल्याची नाेंद आहे. भारताने या मालिकेपुर्वी आॅस्ट्रेलिया दाैऱ्यात टी-२० ची सिरीज खेळली हाेती. यादरम्यान दुखापतीमुळे राेहित शर्मा हा खेळू शकला नाही. या मालिकेत धवन व राहुलने दमदार अर्धशतकी भागीदारी केली हाेती.

फेब्रु. २०१९: मालिकेत भारत पराभूत
भारताला अखेरच्या टी-२० मालिकेत फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला होता. ती महेंद्रसिंग धोनीची भारताकडून अखेरची टी-२० मालिकादेखील होती. त्यानंतर ७ मालिकेत सहामध्ये विजय व १ मालिका बरोबरीत राहिली.

72 धावा काढताच विराट टी-२० मध्ये ३ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. 1 बळी घेताच चहल बुमराहला (५९) मागे टाकत. सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरेल.

बातम्या आणखी आहेत...