आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • T20 | India | Marathi News | India's Eighth Consecutive Victory; Won The Sixth Series At Home; The Third T20 Match Will Be Played At Eden Gardens Tomorrow

टी-20:भारताचा सलग आठवा विजय; घरच्या मैदानावर सहावी मालिका जिंकली; तिसरा टी-20 सामना उद्या ईडन गार्डन मैदानावर

कोलकाता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या सामन्यात विंडीजचा पराभव; भारताची 2-0 ने विजयी आघाडी

माजी कर्णधार विराट काेहली (५२) आणि सामनावीर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (नाबाद ५२) झंझावाती खेळीच्या बळावर यजमान टीम इंडियाने शुक्रवारी मालिका विजय संपादन केला. भारतीय संघाने आपल्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीज संघाचा पराभव केला. यजमान भारताने ८ धावांनी सामना जिंकला. यासह भारतीय संघाने सलग आठवा विजय मिळवला. तसेच घरच्या मैदानावर सलग सहावी मालिका जिंकली.

राेहित शर्माच्या कुशल नेतृत्वात भारतीय संघाने घरच्या मैदानावरील पाहुण्या विंडीजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. यातून विंडीजला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना उद्या रविवारी ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. नाणेफेक जिंकून विंडीज संघाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला.

विंडीजचा दाैऱ्यावर सलग दुसरा मालिका पराभव
भारतीय संघाने आता दाैऱ्यावर आलेल्या विंडीज टीमविरुद्ध घरच्या मैदानावरील सलग दाेन मालिका आपल्या नावे केल्या आहेत. टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाने यापूर्वी तीन वनडे सामन्यांची ापल्या नावे केली आहे. तसेच भारताने विंडीजवर सलग चाैथा मालिका विजय मिळवला. विंडीज संघाला आता दाैऱ्यावर सलग दाेन मालिका गमावण्याच्या नामुष्कीला सामाेरे जावे लागले. टीमला दाेन्ही मालिकेत सुमार खेळीचा फटका बसला. पाेलार्डला १०० व्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. त्याने करिअरमधील १०० वा टी-२० सामना खेळला.

माजी कर्णधार विराट काेहली (५२) आणि सामनावीर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (नाबाद ५२) झंझावाती खेळीच्या बळावर यजमान टीम इंडियाने शुक्रवारी मालिका विजय संपादन केला. भारतीय संघाने आपल्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीज संघाचा पराभव केला. यजमान भारताने ८ धावांनी सामना जिंकला. यासह भारतीय संघाने सलग आठवा विजय मिळवला. तसेच घरच्या मैदानावर सलग सहावी मालिका जिंकली. राेहित शर्माच्या कुशल नेतृत्वात भारतीय संघाने घरच्या मैदानावरील पाहुण्या विंडीजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. यातून विंडीजला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना उद्या रविवारी ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. नाणेफेक जिंकून विंडीज संघाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ गड्यांच्या माेबदल्यात विंडीज संघासमाेर विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात विंडीज संघाला ३ गडी गमावत १७८ धावांपर्यंत मजल मारता आली. विंडीजकडून पुरन (६२) व पाॅवेलची (नाबाद ६८) अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.

बातम्या आणखी आहेत...