टी-20 लीग / बीसीसीअायला यंदाची अायपीएल रद्द झाल्यास चार हजार काेटींचा फटका


  • स्थिती पाहून अायपीएल अायाेजनाचा घेतला जाईल पुढील निर्णय  

दिव्य मराठी नेटवर्क

Mar 21,2020 09:00:00 AM IST

मुंबई- काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन अांतरराष्ट्रीय स्तरावर खबरदारी घेतली जात अाहे. क्रीडा क्षेत्रातही याबाबतची प्रचंड काळजी घेतली जात अाहे. यामुळे अनेक माेठ्या स्पर्धांच्या अायाेजनाला स्थगिती देण्यात अाली, तर काही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात अाला अाहे. यामध्येच जगातील सर्वात माेठ्या अाणि लाेकप्रिय असलेल्या अायपीएल स्पर्धेलाही धक्का बसला अाहे. क्रिकेटच्या झटपट व छाेट्या फाॅरमॅटच्या टी-२० अायपीएलला १५ एप्रिलपर्यंत स्थगिती देण्यात अाली. सध्या स्थगिती असली तरीही स्पर्धेच्या अायाेजनावर अद्यापही टांगती तलवार अाहे.

प्रक्षेपण हक्कातून एका सत्रासाठी ३ हजार २६९ काेटींची कमाई

मॅच ५५ काेटी; १ चेंडू २३.३ लाख
: स्टारने अायपीएल प्रक्षेपणाचे हक्क मिळवले. पाच वर्षांच्या करारापाेटी १६ हजार ३४७.५ काेटी माेजले अाहेत. प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीअायला ५५ काेटी मिळणार अाहेत. प्रत्येक चेंडूसाठी २३.३ लाख मिळतात.

टायटलचे ४३९ काेटी बुडीत :व्हीवाे कंपनीने अायपीएल टायटल स्पाॅन्सरसाठी बीसीसीअायसाेबत पाच वर्षांच्या करारासाठी २ हजार १९९ काेटी रुपये निश्चित झाले अाहेत.वर्षाकाठी ४३९ काेटी रुपये अाहे. यंदाची ही लीग रद्द झाल्यास माेठा फटका बसेल.

फ्रँचायझीचे ४ काेटींचे नुकसान :
: अायपीएल रद्दचबाबतचा निर्णयाची शक्यता अाहे. यातून अाता लीगमधील सर्वच फ्रँचायझी अधिकच िचंतेत अाहेत. यातून या प्रत्येक फ्रँचायझींना सामन्यागणिक २.५ ते ४ काेटींचे नुकसान सहन करावे लागणार अाहे.

खेळाडूंना ६८० काेटींचा फटका :
बीसीसीअाय व फ्रँचायझींची भागीदारी प्रत्येकी ५० टक्के असते. अायाेजनातून फ्रँचायझीला खेळाडूंसाठी ८५ काेटी मिळतात. लीग रद्द झाल्याने रक्कम या मिळणार नाही. म्हणजचे खेळाडूंचे ६८० काेटींचे नुकसान हाेणार अाहे.

फेसबुकचा ३९९ काेटींचा करार
: अायपीएलच्या डिजिटल राइट॰ससाठी फेसबुकही मैदानावर उतरले अाहे. यातूनच फेसबुकने बीसीसीअायसाेबत ३९९ काेटींचा करार केला. लीग रद्दची शक्यता अाहे. त्यामुळे बीसीसीअायच्या मिळकतीवर परिणाम पडणार अाहे.

स्टारचे ३३०० काेटींचे नुकसान :
: ब्राॅडकास्टार स्टारच्या अपेक्षेनुसार लीगमधून ३३०० काेटींच्या महसुलाची वसुली हाेईल. मात्र, टीव्ही अाणि डिजिटललाच धाेका निर्माण झाला. जाहिरातीला फटका बसेल. त्यामुळे या प्रक्षेपणातून कमाई हाेणार नाही.

अाफ्रिकेविरुद्ध २ वनडे रद्द झाल्याने मंडळाने १२०.२ काेटी गमावले :

भारत व दक्षिण अाफ्रिका वनडे मालिकेतील उर्वरित दाेन सामने रद्द झाले. काेराेनाच्या भीतीमुळे हा निर्णय घेतला. यातून बीसीसीअाचे १२०.२ काेटींचे नुकसान झाले. कारण, प्रत्येक अांतरराष्ट्रीय सामना प्रक्षेपणातून बीसीसीअायला ६०.१ काेटींची कमाई करता येते.

X