आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 वर्ल्ड कप:विश्वचषकात भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानच्या विरोधात रंगणार! आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयसीसीने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अतिंम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. यामध्ये भारताचा पहिलाच सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

करोना महामारिमुळे भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत. मुख्य स्पर्धेत 12 संघाचा समावेश असेल. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील.

असे रंगणार सामने -
भारत विरुद्ध पाकिस्तान - 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 31 ऑक्टोबर ,संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - 3 नोव्हेंबर, संध्याकाळी 6 वाजता, अबुधाबी
भारत विरुद्ध B 1, 5 नोव्हेंबर - संध्याकाळी 6 वाजता, दुबई
भारत विरुद्ध A 2, 8 नोव्हेंबर - संध्याकाळी 6 वाजता, दुबई

बातम्या आणखी आहेत...