आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • T20 World Cup 2022 India Squad Update; Jasprit Bumrah, Harshal Patel, Bumrah Harshal Passed Fitness Test: Return To Team India In T20 World Cup? Couldn't Play Asia Cup

बुमराह-हर्षल फिटनेस टेस्टमध्ये पास:टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात होणार वापसी ? खेळू शकले नाही आशिया कप

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव झालेल्या टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून बरे झाले आहेत आणि दोघेही पूर्ण तंदुरुस्त आहेत. एवढेच नाही तर टी-20 विश्वचषकासाठी घोषित होणाऱ्या संघासाठी हे दोन्ही वेगवान गोलंदाज आता उपलब्ध असतील.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराह-पटेल यांनी त्यांची फिटनेस टेस्ट पास केली आहे. दोघांचे पुनरागमन टीम इंडियासाठी महत्त्वाचे आहे. बंगळुरू येथील NCAध्ये झालेल्या गोलंदाजीच्या चाचणीत दोघेही पास झाले आहेत.

दुखापतीमुळे आशिया कपमध्ये खेळू शकले नाही

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दोघेही दुखापतींमुळे आशिया चषक 2022 साठी टीम इंडियात स्थान मिळवू शकले नव्हते. 8 ऑगस्ट रोजी जेव्हा आशिया चषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा BCCI ने माहिती दिली की बुमराह आणि हर्षल NCA मध्ये आहेत. बुमराहला जुलैमध्ये पाठीला दुखापत झाली होती त्यानंतर तो पुनर्वसनात होता. पटेल हा वन साइड स्ट्रेनच्या दुखापतीतून जात होता. मात्र नुकतेच या दोन्ही खेळाडूंनी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे.

बुमराह यापूर्वीही जखमी झाला आहे

2019 च्या वर्ल्डकप नंतरही तो जखमी झाला होता.
2019 च्या वर्ल्डकप नंतरही तो जखमी झाला होता.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे यापूर्वीही क्रिकेटपासून दूर होता. 2019 मध्ये वर्ल्ड कपनंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर तो बराच काळ संघाबाहेर होता. परतायला बराच वेळ झाला तरी तो पूर्णपणे लयीत आला नव्हता.

बुमराहच्या दुखापतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची अनोखी गोलंदाजी. तो ज्या पद्धतीने चेंडू टाकतो त्यामुळे त्याच्या पाठीवर खूप ताण येतो. आता या दुखापतीतून सावरल्यानंतर तो कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

हर्षल डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून उदयास आला

हर्षल पटेलने गेल्या IPL मध्ये 19 विकेट घेतल्या आहेत.
हर्षल पटेलने गेल्या IPL मध्ये 19 विकेट घेतल्या आहेत.

हर्षल पटेल गेल्या वर्षी पदार्पण केल्यापासून टी-20 मध्ये भारतासाठी डेथ-ओव्हरचा स्पेशालिस्ट म्हणून उदयास आला आहे. 2022 मध्ये, त्याने 15 T20I मध्ये 8.76 च्या इकॉनॉमी रेटने 19 विकेट घेतल्या आहेत.तर भारताकडून फक्त भुवनेश्वरने 10 सामन्यात 20 बळी घेतले आहेत. त्याचवेळी हर्षलने IPL च्या मागील दोन हंगामातही अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याने IPL 2021 मध्ये 15 सामन्यात 32 विकेट घेतल्या आणि पर्पल कॅप जिंकली होती . त्याचबरोबर यंदाच्या IPL मध्ये हर्षलने 15 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. अशा स्थितीत त्याचे फिटनेस टेस्ट पास करणे टीम इंडियासाठी चांगले ठरू शकते.

भारतीय क्रिकेट संघासमोरील सध्याची आव्हाने

  • अलीकडेच आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडिया पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हरली होती. त्यामुळे टीम इंडियामध्ये निराशा आहे.
  • प्लेइंग-11 मध्ये सतत होत असलेल्या बदलामुळे खेळाडूंना त्यांची भूमिका समजणे कठीण जात आहे.
  • संघाच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्मावरही दबाव आहे. सामन्यादरम्यान त्याची संतप्त शैली पाहायला मिळाली.
  • कर्णधाराच्या दबावामुळे खेळाडूंवरही कामगिरीचे दडपण आहे.
  • विश्वचषक ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे, परंतु संघ अद्याप प्लेइंग-11 निश्चित करू शकलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...