आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • T20 World Cup 2022 India VS England Semifinal; India Lost The Match | Fans Aggressive Reaction | Marathi News

इंग्लंडकडून झालेल्या दारुण पराभवानंतर चाहत्यांचे प्रश्न:राहुल-अश्विनला संघ किती दिवस पोसणार, IPLरेकॉर्ड पाहून रोहितला कर्णधारपद मिळाले का?

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास संपुष्टात आला आहे. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या दारुण पराभवाने चाहते संतापले आहेत. केएल राहुल आणि आर अश्विनला संघात कशामुळे स्थान आहे, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत. आयपीएलचे रेकॉर्ड पाहून रोहित शर्माला कर्णधारपद दिले होते का? चहलला एकाही सामन्यात न खेळवण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

आता सोशल मीडियावर आणि अॅडलेड स्टेडियमबाहेर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया..,.

  • 'आपली ओपनिंग खराब झाली. रोहित पुन्हा चालला नाही. राहुलही बाद झाल्याने संघाची सुरुवात चांगली झाली नाही.'
  • 'मला असे वाटत होते की, भारतीय संघाला अजिबात लढायचेच नव्हते.'
  • 'चहल हा एकच असा गोलंदाज आहे. जो अचूक गोलंदाजी करू शकतो आणि विकेट घेऊ शकतो. त्याला बाहेर बसवून ठेवले. अश्विन सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ करत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राहुल द्रविड कधीच टी-20 बॅट्समन राहिलेला नाही. यानंतरही त्यांना प्रशिक्षक बनवण्यात आले.

वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या कामगिरीचे आम्ही विश्लेषण केले. खालील ग्राफिक्समध्ये जाणून घ्या...

चहल बाहेर बसला, तर इतर संघांचे लेगस्पिनर्स यशस्वी झाले
टीम इंडियाने या स्पर्धेत एकूण 5 सामने खेळले. मात्र एका सामन्यातही लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संधी मिळाली नाही. तर पाकिस्तानचा शादाब खान, इंग्लंडचा आदिल, लिव्हिंगस्टोन आणि ईश सोढी यशस्वी ठरले. विकेट घेण्यासोबतच त्यांनी उत्तम गोलंदाजीही केली.

बातम्या आणखी आहेत...