आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • T20 World Cup England Squad Ben Stokes, Mark Wood And Chris Woakes Return; Jason Roy Out Of Team, England Squad For T 20 World Cup Announced: Ben Stokes, Mark Wood And Chris Woakes Return; Jason Roy Out

T-20 वर्ल्डकपसाठी इंग्लंडची टीम जाहीर:बेन स्टोक्स, मार्क वुड आणि ख्रिस वोक्सचे पुनरागमन; जेसन रॉय मात्र टीमबाहेर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडने T-20 वर्ल्ड कपसाठी 19 जणांची टीम जाहीर केली आहे. बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड यांची संघात वापसी झाली आहे. त्याचबरोबर 2005 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान दौऱ्यावर जाणारा इंग्लिश टीमचीही घोषणा करण्यात आली आहे.

वुड, स्टोक्स आणि वोक्स या तिघांनीही यावर्षी एकही टी-20 इंटरनॅशनल खेळलेले नाही. असे असतानाही त्यांना टीममध्ये संधी मिळाली आहे. त्याचवेळी खराब फॉर्ममध्ये असलेला जेसन रॉयला वर्ल्ड कप आणि पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सिरीजमधून वगळले आहे.

बेन स्टोक्सने यावर्षी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही तो टीमचा भाग असणार नाही.
बेन स्टोक्सने यावर्षी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही तो टीमचा भाग असणार नाही.

दिग्गज खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाहीत

पाकिस्तान दौऱ्यावर इंग्लंडचे अनेक स्टार खेळाडू संघाचा भाग असणार नाहीत. यामध्ये बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस जॉर्डन या खेळाडूंचा समावेश आहे.

जेसन रॉय या वर्षात इंग्लंडसाठी 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने आपल्या बॅटने केवळ 206 धावा केल्या आहेत.
जेसन रॉय या वर्षात इंग्लंडसाठी 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याने आपल्या बॅटने केवळ 206 धावा केल्या आहेत.

इंग्लंडची T-20 वर्ल्डकप टीम

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड

राखीव खेळाडू - लियाम डॉसन, रिचर्ड ग्लेसन, टायमल मिल्स

पाकिस्तान दौऱ्यासाठी इंग्लंडची टी-20 टीम

जोस बटलर (सी), मोईन अली, हॅरी ब्रुक, जॉर्डन कॉक्स, सॅम कुरन, बेन डकेट, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लेसन, टॉम हेल्म, विल जॅक, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, ऑली स्टोन, रीस टोपले, डेव्हिड विली , ख्रिस वोक्स, ल्यूक वुड, मार्क वुड.

बातम्या आणखी आहेत...