आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • T 20 World Cup India Squad Update; Ravindra Jadeja, Virat Kohli, Big Revelation About Jadeja's Injury: Participated In An Adventure Activity Without Permission During The Asia Cup, Injured His Knee

जडेजाच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा:आशिया चषकावेळी परवानगीशिवाय साहसी उपक्रमात सहभाग, गुडघ्याला झाली दुखापत

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. आता त्याच्या झालेल्या दुखापतीबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईमध्ये एक अ‍ॅडव्हेंचर एक्टिविटी करत असताना जडेजाला दुखापत झाली.

जडेजाला टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तेथे वॉटर बेस्ड ट्रेनिंग एक्टिविटीमध्ये भाग घेण्यास सांगीतले. हा उपक्रम हॉटेलच्या आवारात असलेल्या 'बॅकवॉटर' सुविधेत करण्यात आला.

त्याला एका खास प्रकारच्या स्की-बोर्डवर पाण्यात स्वतःचा समतोल साधावा लागणार होता. ही एक अ‍ॅडव्हेंचर एक्टिविटी होती आणि BCCI च्या प्रशिक्षण नियमावलीचा भाग नव्हता. या उपक्रमादरम्यान जडेजा घसरला आणि त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली.

गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतरचे हे छायाचित्र रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतरचे हे छायाचित्र रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

आशिया कप सारख्या महत्वाच्या स्पर्धेदरम्यान प्रशिक्षणाचा भाग नसलेल्या अशा अ‍ॅडव्हेंचर एक्टिविटी मध्ये जडेजाने सहभाग घेतल्याने अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. जडेजाच्या संघात अनुपस्थितीमुळे त्याचा बदली खेळाडू शोधणे कठीण झाले आहे. जडेजा आता मुंबईत आहे. जिथे BCCI चे सल्लागार आणि वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली आहे.

2022 मध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या

जडेजा टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यावर्षी त्याने 9 सामने खेळले असून 50.25 च्या सरासरीने 201 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 141.54 राहिला आहे. पण गोलंदाजीमध्ये त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने 9 सामन्यात केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत.

जडेजा वेस्ट इंडिजविरुद्धची सिरीजही खेळू शकला नाही

आशिया चषकापूर्वी भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या मालिकेतही जडेजा संघाचा भाग नव्हता. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला त्यावेळी निवड समितीने विश्रांती दिल्याचे सांगीतले होते.

बातम्या आणखी आहेत...