आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराT20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्या उपांत्य फेरीच्या दोन दिवस आधी मंगळवारी सकाळी कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटात दुखापत झाली. मात्र, दुखापत गंभीर नव्हती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित नेटमध्ये थ्रोडाऊनचा सराव करत होता. त्याने फक्त 18-20 चेंडू खेळले होते की आर्मर राघवेंद्रचा 150 पेक्षा जास्त वेगाचा एक चेंडू त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला आणि तो सराव सोडून बाहेर आला. वेदनेमुळे 40 मिनिटे बाहेर बसला. मात्र, वैद्यकीय उपचारानंतर रोहित सरावाला परतला. रोहितच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अपडेट आलेले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल फोटो - व्हिडिओमध्ये दुखापत झाल्यानंतर रोहित सराव सोडून नेटमधून बाहेर आला आणि खाली बसल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याला वैद्यकीय मदत मिळाली. यादरम्यान रोहित त्याच्या मनगटावर बर्फ लावताना दिसला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल मंगळवारी नेट सत्राला अनुपस्थित होते. त्याचवेळी दिनेश कार्तिक आणि कर्णधार रोहित शर्मा सरावासाठी आले.
परतल्यावर... 6 शॉट्स खेळून झाल्यावर तो म्हणाला- स्टिकने टाक
नेटवर परतल्यानंतर रोहितला फर्स्ट थ्रोडाउन स्पेशालिस्ट हरीने स्टिकशिवाय गोलंदाजी केली. 6 शॉट्स खेळल्यानंतर रोहित म्हणाला - 'स्टिकने टाक.' त्याने 3 चांगले शॉट्स मारल्यावर राहुलने त्याला टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले.
2 दिवसांनी इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना
टीम इंडियाला 10 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये इंग्लंडविरुद्ध दुसरा सेमीफायनल खेळायचा आहे. इंग्लंडला पराभूत केल्यानंतरच संघ विजेतेपदाच्या फेरीत पोहोचेल. दुसरीकडे, विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 9 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे होणार आहे.
पहिले जाणून घ्या... रोहितला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आलेली नाही
भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर टी-20 विश्वचषकात तो आपल्या बॅटने काही विशेष करू शकला नाही. पण, रणनीतीक रूपात त्याचा संघाच्या विजयात मोलाचा वाटा आहे. रोहितने 5 साखळी सामन्यात फक्त 89 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
आता जाणून घ्या..... उपांत्य फेरीपर्यंत पोहोचलेल्या उर्वरित संघांच्या कर्णधारांची कामगिरी
चारही संघांच्या कर्णधारांना स्पर्धेत खराब फॉर्मचा सामना करावा लागला. गट फेरीतील दोन सामने वगळता चारही कर्णधारांनी फलंदाजीत निराशा केली आहे. भारताच्या रोहितने नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. इंग्लंडच्या बटलरने न्यूझीलंडविरुद्ध नशीब आजमावले. पाकिस्तानचा बाबर आझम संपूर्ण स्पर्धेत टिकला नाही. न्यूझीलंडचा केन विल्यमसन रंगात दिसला नाही. रोहित, बटलर आणि विल्यमसन यांना स्पर्धेत प्रत्येकी एकच अर्धशतक करता आले.
बाबरला अर्धशतकही करता आले नाही. त्याची सर्वात मोठी धावसंख्या बांगलादेशविरुद्ध 25 धावा होती. त्यामुळे संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्या संघांना विजेतेपदाच्या लढतीत स्थान मिळवायचे असेल तर कर्णधारांना फॉर्म सुधारावा लागेल हे महत्त्वाचे आहे. कर्णधार फॉर्मात राहिला तर त्याचाही संघावर सकारात्मक परिणाम होतो. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट पाकिस्तानचा कर्णधार बाबरच्या खराब फॉर्मवर म्हणाला, "तो एक सलामीवीर फलंदाज आहे आणि त्याच्याकडे उत्कृष्ट रेकॉर्ड आहे, पण त्याच्याकडे आव्हानात्मक वेळ आहे." आशा आहे की तो लवकरच फॉर्ममध्ये येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.