आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 विश्वचषक:नेदरलँडने झिम्बाब्वेला प्रथमच हरवले

अॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टी-२० विश्वचषकात सहयोगी संघ नेदरलँडने धक्कादायक निकाल लावला. नेदरलँडने पूर्ण सदस्य झिम्बाब्वेचा ५ गड्यांनी पराभव करून त्यांना जवळपास बाहेरचा रस्ता दाखवला. विश्वचषक स्पर्धेतील पूर्ण सदस्य संघाविरुद्ध नेदरलँडचा हा तिसरा विजय आहे. यापूर्वी नेदरलँडने २००९ आणि २०१४ मध्ये इंग्लंडचा पराभव केला होता. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डच वेगवान गोलंदाजांसमोर झिम्बाब्वे संघ १९.२ षटकांत ११७ धावांत गारद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सच्या मॅक्स ओ’डॉड (५२) आणि टॉम कूपर (३२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. नेदरलँड्सने १८ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले.

बातम्या आणखी आहेत...