आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा फटका:यूएई आणि ओमानमध्ये होऊ शकते टी-20 वर्ल्डकप स्पर्धा; मंडळाची अट : आयोजनाचे हक्क त्यांच्याकडेच राहावेत

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील.

यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचे आयोजन भारताबाहेरच होईल. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला सांगितले की, जर आयोजनाचे अधिकार त्यांच्याचकडे राहिले तर स्पर्धा बाहेर घेण्यास त्यांची हरकत नाही. स्पर्धा यूएईतील तीन शहरे, अबुधाबी, दुबई व शारजासह अोमानची राजधानी मस्कतमध्ये होऊ शकते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी सूत्रांनी सांगितले, आयोजनाचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला २८ जूनपर्यंतची वेळ मिळाली आहे.

आम्ही स्पर्धा देशाबाहेर हलवण्यास तयार असून आयसीसीला सांगितले आहे. स्पर्धेत १६ संघ सहभागी होतील. आधीचे सामने मस्कतला होऊ शकतात. जर आयपीएल १० ऑक्टोबरला संपली तर यूएईत टी- २० सामने नोव्हेंबरमध्ये सुरू होऊ शकतील. यामुळे पिच तयार करायला तीन आठवड्यांचा वेळ मिळेल. ओमाननेही म्हटले आहे की, ते आयोजनासाठी तयार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयपीएल अर्ध्यातच थांबवावे लागले आणि टी- २० वर्ल्डकपच्या देशातील आयोजनावरही शंका आहे.

बातम्या आणखी आहेत...