आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे:टीम इंडियाला मालिका विजयाच्या हॅट‌्ट्रिकची संधी; इंग्लंडची कसरत, भारताकडून सूर्यकुमार वनडेत पदार्पण करण्याची शक्यता!

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा सलामीवीर राेहित शर्मा अाणि गाेलंदाज चहल सातत्याने साेशल मीडियावर फाेटाे पाेस्ट करून चर्चेत असतात.असाच फाेटाे त्यांनी शेअर केला हाेता. - Divya Marathi
टीम इंडियाचा सलामीवीर राेहित शर्मा अाणि गाेलंदाज चहल सातत्याने साेशल मीडियावर फाेटाे पाेस्ट करून चर्चेत असतात.असाच फाेटाे त्यांनी शेअर केला हाेता.
  • भारत-इंग्लंड आज दुसरा सामना; प्रक्षेपण दुपारी 1.30 वाजेपासून

पुण्यातील मैदानावर दिमाखदारपणे सलामी देणारा भारतीय संघ अाज शुक्रवारी मालिका विजयाची हॅट‌्ट्रिक साजरी करण्यासाठी सज्ज झाला अाहे. कसाेटी, टी-२० पाठाेपाठ अाता विश्वविजेत्या इंग्लंड संघाविरुद्धची वनडे मालिकाही अापल्या नावे करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि इंग्लंड यांच्यात अाज दुसरा वनडे सामना हाेणार अाहे. विजयी सलामीने भारतीय संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडीवर अाहे. भारताने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्यातील मैदानावर पहिला सामना ६६ धावांनी जिंकला हाेता. इंग्लंड संघासाठी दुसरा वनडे हा निर्णायक सामना अाहे. यातील पराभवाने इंग्लंड टीमवर दाैऱ्यात सलग तिसरी मालिका गमावण्याची नामुष्की अाेढवणार अाहे.

यापूर्वी, भारताने कसोटी (३-१) व टी-२० (३-२) मालिका जिंकली. मात्र, टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणारा श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो मालिकेतून बाहेर झाला. त्याच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवचा पदार्पणाचा मार्ग मोकळा झाला. त्याने टी-२० मालिकेत पदार्पणात आपली छाप सोडली. इंग्लंडच्या या दौऱ्यात पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले आहे. कसोटीत अक्षर, टी-२० मध्ये ईशान, सूर्यकुमार व एकदिवसीयमध्ये कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णाने. कृणालने २६ चेंडूंत अर्धशतक झळकवल्यानंतर बळी देखील घेतला. दुसरीकडे, प्रसिद्ध पहिल्या स्पेलमध्ये महागडा ठरला होता. पुनरागमन करत त्याने ४ फलंदाज टिपले. धवनने ९८ धावांची खेळी केली. रोहिताच्या हाता ला चेंडू लागला होता आणि त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी आला नव्हता.

२०१४ नंतर इंग्लंडवर दुसरी मालिका गमावण्याचे सावट

इंग्लंडचा गत एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून २-१ ने पराभव झाला आहे. अाता दुसऱ्या वनडेतील पराभवाने इंग्लंड २०१४ नंतर प्रथमच सलग दुसरी मालिका गमावणार अाहे. २०१४ मध्ये यजमान इंग्लंड टीमला घरच्या मैदानावर पाहुण्या श्रीलंकेने ३-२ व भारताने ३-१ ने मालिकेत पराभूत केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...