आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • Cricket
 • Team India | BCCI | Cricket | Marathi News | Delhi Punjab Mumbai Opener Certain; Gujarat Has Experienced Batsmen, Lack Of Spin In Lucknow Team

दिव्य मराठी अ‍ॅनालिसिस:दिल्ली-पंजाब-मुंबईचे सलामीवीर निश्चित; गुजरातकडे अनुभवी फलंदाज, लखनऊ संघामध्ये फिरकीचा अभाव

चंद्रेश नारायणन | मुंबई6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मजबूत भारतीय काेअर टीमसाठी फ्रँचायझींचा युवा खेळाडूंवर खर्च
 • कुशल खेळाडूंसह चेन्नई टीम आता झाली संतुलित

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) लिलाव प्रक्रियेनंतर आता १५ व्या सत्रातील आयपीएलच्या आयाेजनासाठी कंबर कसली आहे. याची तयारीही आता शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे बाेली प्रक्रियेतून यंदा स्पर्धेत सहभागी हाेणाऱ्या दहा संघांनी आपल्या खेळाडूंचे पथक सज्ज केले आहे. थेट मैदानावर उतरून विजयी माेहीम ठेवण्यावर या सर्व संघांची नजर लागली आहे. यंदाच्या आयपीएलसाठी मुंबई , पंजाब आणि दिल्लीने आपली सलामीची जाेडी निश्चित केली आहे.

यंदाच्या लिलाव प्रक्रियेदरम्यान सर्वच फ्रँचायझींनी स्थानिक युवा आणि अनुभवी खेळाडूंवर काेट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. यातून भारतीय संघासाठी काेर टीम तयार हाेणार आहे. तसेच श्रीलंकेच्या पाच खेळाडूंवर बाेली लागली. याचा निश्चित असा माेठा फायदा स्थानिक क्रिकेटला हाेईल.

केकेआरकडे आक्रमक सलामीवीरांचा अभाव

पंजाब, दिल्ली आणि मुंबई इंडियन्स संघाने आगामी सत्रासाठी आपली सलामीवीरांची जाेडी निश्चित केली आहे. या तिन्ही संघांकडे इतर टीमच्या तुलनेत सलामीवीर फलंदाज अधिक मजबूत आहेत. लखनऊ संघात सहा आंतरराष्ट्रीय ऑलराउंडरचा सहभाग आहे. त्यामुळे टीमची बॅटिंग लाइनअप आक्रमक ठरणारी आहे. काेलकाताकडे आक्रमक सलामीवीर फलंदाजांचा अभाव आहे. तसेच दुबळ्या मधल्या फळीने बंगळुरू टीमच्या मार्गात अडसर निर्माण हाेऊ शकेल, असे चित्र आहे.

यंदाच्या लिलाव प्रक्रियेतील लक्षवेधी ठरल्या काही घडामाेडी

 • प्रतिष्ठेला नव्हे, कामगिरी ठरली अधिक सरस. विश्वविजेत्या टीमचा कर्णधार फिंच व माेर्गनवर बाेली लागली नाही.
 • रॅकिंग ठरली दुबळी. टी-२० चा सर्वाेत्तम फलंदाज डेव्हिड मलान व गाेलंदाज शम्सीकडे पाहिल्यावर प्रत्यय येताे.
 • जगातील सर्वाेत्तम ऑलराउंडर असूनही शाकीबला नाही मिळाली संधी.
 • अनसाेल्ड झंपा, लामिछाने व इम्रानला मिळाली नाही संधी.
 • जगातील सर्वाेत्तम फलंदाज असूनही स्मिथ व लबुशेनवर नाही लागली बाेली.
बातम्या आणखी आहेत...