आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय संघ व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली मैदानावर नेहमी पांढऱ्या रंगाचा बूट घातलेला दिसतो. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल. त्याने स्वत:च सांगितले की, पांढऱ्या रंगाचे बूट घालून फलंदाजी करायला का उतरतो? कोहलीने लाइव्ह चॅटदरम्यान इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गुआर्डिओला सांगितले की, “मला पांढरा बूट घालून फलंदाजी करण्यास आवडते. हे माझ्यासाठी अंधश्रद्धेपेक्षा अधिक आहे. जेव्हा मी फलंदाजी करण्यास उतरतो, त्यात माझा जीव असतो आणि मी स्वत: त्याच्या एकदम जवळ राहून प्रदर्शन करू इच्छितो.’ ३१ वर्षीय कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराटने गुआर्डिओलाला ते कोणता बूट घालतात हे विचारले. गुआर्डिओलाने म्हटले की, “मी जेव्हा खेळत होतो तेव्हा केवळ काळ्या रंगाचे बूट होते. आता काळे बूट शोधणे कठीण आहे. एकदा मी लाल रंगाचे बूट घातले होते तेव्हा माझे मार्गदर्शक व प्रशिक्षक जोहान क्रिफने मला लालऐवजी काळे बूट घालण्यास सांगितले होते.’ ४९ वर्षीय गुआर्डिओलाने म्हटले, “रिकाम्या स्टेडियममध्ये खेळताना असे वाटते की, मैत्रीपूर्ण सामना सुरू आहे. आम्हाला चाहत्यांची आठवण येते. सर्व काही सुरक्षित झाल्यानंतर आपल्याला लोकांना स्टेडियममध्ये आणावे लागेल.
पिता बनण्यापूर्वी मेरी कोमकडून मार्गदर्शन घेऊ इच्छितो कोहली :
कोहलीने सहा वेळची जागतिक विजेता बॉक्सर एमसी मेरी कोमशीदेखील चॅट केले. कोहली पुढील वर्षी जानेवारीत पिता बनणार आहे. पिता म्हणून जबाबदारीमध्ये संतुलन राखण्यासाठी मेरी कोमकडून मार्गदर्शन घेऊ इच्छितो. कोहलीने मेरी कोमला विचारले, “तुम्ही आई आहात. स्पर्धेत सहभाग घेतला हे सर्व कसे केले? तुम्ही कसा ताळमेळ जुळवला. आईची भूमिका व ताळमेळ बनवण्याबाबत चर्चा करण्यासाठी मी तुमची निवड केली.
कॅप्टनकडे वाइड, फुलटॉसच्या परीक्षणाचा पर्याय असावा
आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत वाइड व कमरेच्या वरील फुलटॉस चेंडूचे परीक्षण करण्यासाठी कर्णधाराकडे पर्याय असायला हवा, असे कोहलीने म्हटले. अनेक वेळा हे निर्णय चुकीचे ठरू शकतात. अशा वेगवान खेळात अशी छोटी चूक झाली तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही एका धावेने पराभूत झाल्यास आणि तुमच्याकडे वाइडच्या परीक्षणाचा पर्याय नसेल तर कोणत्याही संघासाठी मोठा धक्का असेल. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार राहुलनेदेखील कोहलीचे समर्थन करत म्हटले की, अशा प्रकारचा नियम असल्यास खूप चांगली गोष्ट होईल. यातून कर्णधाराकडे महत्वाचे निर्णय घेता येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.