आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Team India Experiments After Asia Cup: 19 man Squad For Australia South Africa, Not 15; The Best Team Will Be Selected For The T 20 World Cup

आशिया कपनंतर टीम इंडियात प्रयोग:ऑस्ट्रेलिया-द.आफ्रिकेसाठी 15 नव्हे तर 19 खेळाडूंचा स्क्वॉड; T-20 वर्ल्डकपसाठी बेस्ट टीम निवडणार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया कपमधील पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) टीम इंडियामध्ये एक मोठा प्रयोग राबवणार आहे. याचे कारण म्हणजे येत्या 16 ऑक्टोबरपासून होणारा टी-20 वर्ल्डकप. या मोठ्या स्पर्धेसाठी BCCI ला टीम इंडियातील बेस्ट कॉम्बिनेशन निवडायचे आहे.

आता जाणून घेऊया काय आहे तो मोठा प्रयोग. BCCI च्या सुत्राने दिव्य मराठीला सांगीतले की भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेची टीम T-20 आणि वनडे सिरीजसाठी येणार आहे. या टीमसोबत खेळल्या जाणार्‍या सामन्यांसाठी टीम इंडियात मोठे बदल करण्यात येणार आहे.या दोन सिरीजसाठी टीम इंडियात सदस्यसंख्या ही 15 नसून 19 सदस्यांची असेल.

20 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान ऑस्ट्रेलिया-आफ्रिका टीम भारतात दौऱ्यावर

ऑस्ट्रेलियाची टीम 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची T-20I सिरिज आहे. तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेची टीम भारतात येणार आहे. 28 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान आफ्रिकन टीमसोबत 3 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांची सिरीज खेळली जाणार आहे. सुरूवातीला T-20 सामने खेळवले जातील.

आता जाणून घ्या या प्रयोगाची 3 कारणे…

1. आशिया कपमधील पराभवानंतर ‘टीम मॅनेजमेंटला असे वाटते की, वर्ल्डकपसाठी आवश्यक असलेल्या परफेक्ट कॉम्बिनेशनचा शोध अद्याप पूर्ण झालेला नाही.

2. आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांच्या अनुपस्थितीत संघाचा पेस अटॅक कमकुवत दिसत होता. स्पर्धेच्या मध्यभागी आवेश खान आजारी पडल्यानंतर हा विभाग कमकुवत झाला. त्यामुळे टीम इंडियाला सुपर - 4 सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

3. टीम मॅनेजमेंटला वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या होम सिरिजमध्ये परफेक्ट कॉम्बिनेशनचा शोध पूर्ण होईल.

दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडलेले जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल तंदुरुस्त आहेत. त्याचे टीम इंडियात पुनरागमन निश्चित आहे. आवेशही आता या आजारातून बरा झाला आहे.
दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडलेले जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल तंदुरुस्त आहेत. त्याचे टीम इंडियात पुनरागमन निश्चित आहे. आवेशही आता या आजारातून बरा झाला आहे.

हे चार चेहरे समाविष्ट केले जाण्याची शक्यता

दीपक चहर आणि अर्शदीप

बुमराह आणि हर्षल पटेलची वापसी होत आहे.अशा परिस्थितीत आशिया कप स्पर्धेत असलेल्या टीम इंडियातील आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांना बाहेर केले जाण्याची शक्यता आहे.

बुमराहच्या वापसी नंतर, टीम इंडियात हर्षल पटेल सोबतच आणखी दुसरा कोणता जोडीदार असू शकेल हे अद्याप टीमने ठरवलेले नाही. त्यामुळे बोर्ड दीपक चहर आणि अर्शदीपला संधी देण्याची शक्यता आहे.

अर्शदीप सिंगने आशिया कपमध्ये शानदार कामगिरी केली होती. अर्शदीप हा डेथ ओव्हर्सचा उत्कृष्ट गोलंदाज आहे. तर दीपक चहरकडे स्विंग आहे आणि तो महत्त्वाच्या वेळी फलंदाजीही करू शकतो.

दीपक हुडा

फलंदाजीतही चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळण्यासाठी पाठवायचे हे अद्याप टीमने ठरवलेले नाही. दीपक हुडालाही फार कमी संधी मिळाली आहे. दीपकचा प्लस पॉइंट म्हणजे तो स्पिनरही आहे. सूर्य कुमारचे टीम इंडियातील स्थान निश्चित झाले आहे, परंतु त्याचा क्रमांक निश्चित झाला नाही.

रवी बिश्नोई

रवींद्र जडेजाला दुखापत झाली आहे आणि आता गुडघ्याच्या ऑपरेशननंतर तो वर्ल्डकपमधून बाहेर असणार हे निश्चित आहे. त्यांच्या बदली कोणाला घ्यायचे हे टीमने अद्याप ठरवलेले नाही. व्यवस्थापन अक्षर पटेल किंवा रवी बिश्नोई यांचा विचार करू शकते. रवी बिश्नोईने आशिया कपमध्ये चांगली गोलंदाजी करत विकेट्सही घेतल्या आहेत. मात्र, त्याला फारशी संधी मिळाली नाही. तर अक्षर हा एक चांगला फलंदाजही आहे.

टीम इंडियाची 19 सदस्यीय टीम अशी असू शकेल

1. रोहित शर्मा (कर्णधार), 2. केएल राहुल (उपकर्णधार), 3. विराट कोहली,

4. सूर्यकुमार यादव, 5. ऋषभ पंत (विकेटकीपर), 6. दीपक हुडा, 7. दिनेश कार्तिक (विकेटकीपर), 8. हार्दिक पंड्या, 9. जसप्रीत बुमराह, 10. हर्षल पटेल, 11. आर. अश्विन, 12. युझवेंद्र चहल, 13. रवी बिश्नोई, 14. भुवनेश्वर कुमार, 15. अर्शदीप सिंग, 16. आवेश खान, 17. अक्षर पटेल, 18. दीपक चहर, 19. मोहम्मद शमी

बातम्या आणखी आहेत...