आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ:6 फास्ट बॉलर, 3 स्पिनर, हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांना संधी नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. चीफ सलेक्टर चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात निवड समितीने 20 खेळाडूंची निवड केली. यात 6 वेगवान गोलंदाज आणि 3 फिरकी गोलंदाज आहेत.

दुखापतीनंतर रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांचे संघात पुनरागमन झाले आहे, तर हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांना निवड समितीने संघाबाहेर ठेवले आहे. भारत आणि न्यूझीलंड 18 जून रोजी पहिल्यांदा होत असलेल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये समोराससमोर असतील. हा सामना साऊथॅम्प्टनमधील दि एजेज बाउल स्टेडियमवर खेळला जाईल.

टीम इंडिया

  • फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा
  • विकेटकीपर : ऋषभ पंत, लोकेश राहुल आणि ऋद्धिमान साहा (राहुल-साहा याना फिटनेस टेस्ट क्लिअर करावी लागेल)
  • स्पिन ऑलराउंडर : हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर
  • फास्ट बॉलर : जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकुर आणि उमेश यादव
बातम्या आणखी आहेत...