आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Asia Cup 2022, Team India Fun In Dubai: Indian Players Celebrate Reaching Super 4 By Boating, Surfing

दुबईत टीम इंडियाची मस्ती:भारतीय खेळाडूंनी साजरा केला बोटिंग, सर्फिंग करून सुपर-4 मध्ये पोहोचल्याचा आनंद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

UAE मध्ये सुरू असलेल्या आशिया कपच्या टॉप-4मध्ये स्थान मिळवलेली टीम इंडिया समुद्रकिनारी मस्ती करताना दिसली. शुक्रवारी BCCI ने यासंदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केला

या व्हिडिओ मध्ये सलामीवीर केएल राहुल आणि अर्शदीप सिंग सर्फिंग करताना दिसत आहेत, तर कर्णधार रोहित शर्मा बोटिंगचा आनंद लूटताना दिसत आहे. त्याचवेळी चहल-अश्विन हे पॅडल बोट चालवताना दिसत आहेत. एवढेच नाही तर विराट कोहलीसह टीम इंडियातील इतर खेळाडूही बीचवर व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहेत.

व्हिडिओच्या सुरुवातीलाच अर्शदीप सिंगची एन्ट्री आहे, त्यानंतर विराट कोहली लाइफ जॅकेट घातलेला दिसत आहे. 1 मिनिट 34 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. तासाभरात हा व्हिडिओ 49 हजार लोकांनी पाहिला आहे.

टीम इंडियाला सुपर-4 चा पहिला सामना खेळायचा आहे. रविवारी त्याचा सामना पाकिस्तान-हाँगकाँगच्या विजेत्याशी होणार आहे. आज जर पाकिस्तान जिंकला, तर 4 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानचा शानदार सामना पाहायला मिळेल. आज पाकिस्तान हरला तर सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात भारत-हाँगकाँग एकमेकांना भिडतील.

चहल म्हणाला - टीम बॉंडिग वाढते

यादरम्यान चहल सांगतो की, सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे एक फन एक्टिव्हिटीचे आयोजन करण्यात आले आहे. यात खूप मजा येणार असून सगळेच खूप आनंदी आणि उत्साही आहेत.अशा प्रकारच्या एक्टिव्हिटीमुळे टीममध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि बॉंडिग निर्माण होते आणि तुम्ही एकसंघ म्हणून पुढे जाता.

हाँगकाँगचा पराभव करून टीम इंडिया पोहोचली आहे सुपर- 4 मध्ये

हाँगकाँगवर एकतर्फी विजय मिळवत टीम इंडिया सुपर-4 फेरीत पोहोचली आहे. टीम इंडियाने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने पहिल्यांदा 192 धावा केल्या. त्यानंतर हाँगकाँगचा संघ लक्ष्याचा पाठलाग करत 152 धावांतच आटोपला.

भारताच्या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव. त्याने 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा काढल्या. विराट कोहली 44 चेंडूत 59 धावा करून नाबाद राहिला तर केएल राहुलने 39 चेंडूत 36 धावा काढल्या.

टीम इंडियामध्ये वाढत आहे व्हिडिओ कल्चर

टीम इंडियामध्ये सध्या व्हिडिओ कल्चर वाढत आहे. टीम मधील खेळाडू हे त्यांच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. मागील काही महिन्यांमध्ये टीम इंडियाने प्रत्येक विजयानंतर सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मग तो वेस्ट इंडिजचा दौरा असो, झिम्बाब्वेचा किंवा आयर्लंडचा. इन्स्टा रीलबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियातील शिखर धवन, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा अनेकदा त्यांचे रील व्हिडिओ शेअर करत असतात. कोहलीही त्याच्या एक्सरसाइजचे व्हिडिओही शेअर करत असतो.

'काला चष्मा' वरील डान्स व्हिडिओ हा ट्रेंडिंगमध्ये होता

गेल्या आठवड्यात टीम इंडियाने सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये टीमचे खेळाडू ‘काला चष्मा’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

टीम इंडियाने झिम्बाब्वेला 3 वनडे सिरीज मध्ये क्लीन स्वीप केला होता, त्यावेळी सेलिब्रशेनचा तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि चाहत्यांनीही त्याला खूप पसंद केले होते

बातम्या आणखी आहेत...